Marathi govt jobs   »   MPSC Good News | 15000 Vacancies...

MPSC Good News | 15000 Vacancies will be filled soon | MPSC च्या 15000 रिक्त जागा लवकरच भरणार

MPSC Good News | 15000 Vacancies will be filled soon | MPSC च्या 15000 रिक्त जागा लवकरच भरणार_2.1

 

MPSC च्या 15000 रिक्त जागा लवकरच भरणार

विधानसभेत एमपीएससी परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असताना दिनांक 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 जुलै रोजी सभागृहात केली होती.

31 जुलै 2021 पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार

राज्य सरकारने राज्यात लवकरच १५५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सद्या असलेली संख्या ४ असून ३१ जुलै पर्यंत सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ६ जुलै-2021 ला केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आयोगास सांगण्यात आले आहे. तसेच आयोगाने ज्या सहा परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करून शिफारस केलेल्या ८१७ उमेदवारांना लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे.

MPSC Good News | 15000 Vacancies will be filled soon | MPSC च्या 15000 रिक्त जागा लवकरच भरणार_3.1

२०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रलंबित परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याबाबत आयोगास सूचना देण्यात आल्या आहेत. आयोगाकडे विविध टप्प्यांवर प्रलंबित असणाऱ्या सन २०१९च्या तीन परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र ६९९८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच सन २०१९ मधील दोन परीक्षांच्या ४५१ पदे आणि सन २०२० मधील आठ परीक्षांमधील १७१४ पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत लवकर करण्यात येणार आहे.

ही १५ हजार ५११ पदे खालीलप्रमाणे आहेत ?

अ वर्ग (Group-A)- ४,४१७

ब वर्ग (Group-B) – ८,०३१

क वर्ग (Group-C)- ३,०६३

एकूण – १५,५११

 

तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगानेही पुढील वर्षी होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी घोषित करण्यात येणार आहे. तसेच केद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच उमेदवारांची वयोमर्यादा आणि परीक्षेच्या संधी याबाबतही सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे.

माहिती स्रोत- लोकसत्ता

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!