Marathi govt jobs   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षेची तारीख...

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली, अधिकृत सूचना पहा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा : दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सदर परीक्षा ही दिनांक 16 व 17 डिसेंबर 2023 रोजी होणार होती. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत एकूण 60 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या आधीसुद्धा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षा ही 04 आणि 05 नोव्हेंबर 2023 या दोन दिवशी घेण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या लेखात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 बद्दल सविस्तर माहिती तपासा.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पदांचे नाव

जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक

एकूण रिक्त पदे 60
परीक्षेची तारीख 16 डिसेंबर ते 17 डिसेंबर  पुढे ढकलण्यात आली
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mahawakf.com/

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 16 डिसेंबर ते 17 डिसेंबर  पुढे ढकलण्यात आली 

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली: अधिकृत सूचना 

दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा असल्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचे प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचे प्रसिद्धीपत्रक

 

 

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा तारीख जाहीर झाली आहे का ?

होय, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा तारीख जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षेच्या तारखेबद्दल अपडेट मला कोठे मिळतील?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षेच्या तारखेबद्दल अपडेट या लेखात मिळतील.