Maharashtra Competitive Exam Update 2022 given by the Government of Maharashtra. Maharashtra Government removed restrictions on the Recruitment Process. Maharashtra State government has approved the resumption of the government recruitment process, which was suspended due to Corona. Approved departments have been approved to fill 100 percent of vacancies within the purview of the Public Service Commission and 50 percent of vacancies outside the purview of the Commission.
Maharashtra Competitive Exam Update 2022 | |
Category | Latest Post |
Name | Maharashtra Competitive Exam Update 2022 |
Date of Maharashtra Govt. GR | 12-04-2022 |
Maharashtra Competitive Exam Update 2022
Maharashtra Competitive Exam Update 2022: महाराष्ट्र सरकार ने 12 एप्रिल 2022 Maharashtra Competitive Exam Update 2022 बद्दल एक GR जाहीर केला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रातील MPSC च्या अंतर्गत येणारी सर्व पदांसाठी 100% आणि सरळसेवेने भरल्या जाणाऱ्या पदांसाठी 50 % क्षमतेने रिक्त पदे भरण्यास महाराष्ट्र शासनाने अनुमती दिली आहे. आज या लेखात आपण याच Maharashtra Competitive Exam Update 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे सोबतच Maharashtra Competitive Exam Update 2022 अंतर्गत आगामी काळात कोणकोणती पदभरती होणार आहे याबद्दल आढावा घेणार आहे.
Maharashtra Competitive Exam Update 2022 – Govt. Removed Restriction on Recruitment Process | नोकरभरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
Maharashtra Competitive Exam Update 2022: करोनामुळे स्थगित केलेली शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील 50 टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावरील व निवृत्तिवेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता, राज्य सरकारने रिक्त पदभरती आणि नवीन नोकर भरतीबाबत संथगतीने वाटचाल सुरू ठेवली होती. 2016 मध्ये एक आदेश काढून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध तयार करून त्याला शासनाची मान्यता घेण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधीनस्त कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. आकृतिबंध तयार नसेल तर रिक्त पदे भरण्यास किंवा नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्यात येणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले होते.
राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध विभागांनी सुधारित आकृतिबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच, पुढे मार्च 2020 मध्ये करोनाचे संकट ओढवले म्हणून महाराष्ट्र शासनाला या भरती प्रकियेवर बंदी घालावी लागली. आता ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

सोबतच कोविड – 19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि.04 मे 2020 चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्च स्तरीय सचिव समितीने / उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. वरील प्रमाणात पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल. हा Maharashtra Competitive Exam Update 2022 GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Competitive Exam Update 2022 GR
Maharashtra Competitive Exam Update 2022 – Upcoming Govt Jobs | महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022
Maharashtra Competitive Exam Update 2022 – Upcoming Govt Jobs: 2022 या वर्षात आपणास अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या प्राप्त माहितीप्रमाणे तलाठी भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती व लेखा व वित्त विभागात (Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022) भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. ही पदभरती मोठ्या स्वरूपात होणार असून हजारो रिक्त पदे शिल्लक आहेत व यास मान्यता मिळालेली आहे. कोणकोणत्या विभागाची अधिसूचना आपणास येणाऱ्या काळात दिसेल याबद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Upcoming Govt Jobs In Maharashtra 2022
Maharashtra Competitive Exam Update 2022 – Adda247 Marathi Class and Test Series | Adda247 मराठीचे क्लासेस आणि टेस्ट सिरीज
Maharashtra Competitive Exam Update 2022 – Adda247 Marathi Class and Test Series: वर्ष 2022 मध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षा होणार आहेत जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, सरळ सेवा भरती, पोलिस भरती, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षा. या वर्षी सर्व उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत रिक्त जागा कमी आणि उमेदवार खूप जास्त असतात त्यामुळे अशात अश्या उमेदवारांची निवड होते जे इतरांपेक्षा अधिक सराव आणि योग्य अभ्यास करतात. उमेदवाराला मदत करण्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी Online Classes आणि Test Series आणली आहे. त्याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Adda247 Maharashtra Mahapack 2022

FAQs: Maharashtra Competitive Exam Update 2022
Q1. महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेवरील बंदी उठवली का?
Ans. होय, महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेवरील बंदी उठवली आहे.
Q2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील किती टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे?
Ans. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
Q3. सरळ सेवा भरतीद्वारे किती टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे?
Ans. सरळ सेवा भरतीद्वारे 50 टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे
Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
