Marathi govt jobs   »   Latest Post   »   Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance, गणेश चतुर्थी बद्दल माहिती

Ganesh Chaturthi 2022: Ganesh Chaturthi is celebrated during Vinayaka Chaturthi in Bhadrapada. Ganesh Chaturthi 2022 is a 10-day festival celebrated with enthusiasm in Maharashtra. Ganesh Chaturthi 2022 has its own long tradition. Ganapati is the god of prosperity and wisdom. In this article, we will see detailed information about Ganesh Chaturthi 2022.

Ganesh Chaturthi 2022
Category Latest Post
Festival Ganesh Chaturthi 2022
Date 31st August 2022

Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022: भाद्रपदातील विनायक चतुर्थी दरम्यान गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) साजरी केली जाते. Ganesh Chaturthi 2022 10 दिवसांचा उत्सव महाराष्ट्रात उत्साहात साजरा केल्या जातो. Ganesh Chaturthi 2022 ला स्वतःची दीर्घ परंपरा आहे. गणपती समृद्धी आणि बुद्धीची देवता आहे.  गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते अशी मान्यता आहे. गणपती बुद्धीची देवता असल्याने विध्यार्थी जीवनात खूप लोक गणपतीची पूजा करतात. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. कोणत्याही पूजेत गणपतीची पहिले आराधना केली जाते. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. आज या लेखात आपण Ganesh Chaturthi 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Ganesh Chaturthi 2022 | गणेश चतुर्थी 2022

Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पा मोरयाच्या जयंतीनिमित्त गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) उत्सव साजरा केला जातो. पुराणात सांगितल्यानुसार, शिशु गणेश, माता पार्वतीच्या भागातून आला होता. भाद्र शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री गणेश जी (भगवान गणेशाचा) जन्म झाला. त्याच्या मातृभक्तीमुळे, भगवान गणेश हे आराध्य दैवत बनले. भारतात, गणेश चतुर्थी प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पूर्वेकडील मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये स्थानिक समुदाय गटांद्वारे घरी आणि सार्वजनिकपणे साजरी केली जाते. या लेखात Ganesh Chaturthi 2022 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_40.1
Adda247 Marathi Application

Ganesh Chaturthi Story | गणेश चतुर्थी पौराणिक कथा

Ganesh Chaturthi Story: पुराणात या सणाची माहिती घेतली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले व गणपतीला बाहेर पहारा देण्यासाठी नेमुन माता पार्वती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले. गणपतींनी भगवान शकारांना रोखले तेव्हा क्रोधीत होऊन महादेवानी गणपतीचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने त्या क्रोधीत झाल्या. पार्वतीचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले. तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) दिवस होता आणि तेव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_50.1
गणेश चतुर्थी 2022

Sarvajanik Ganesh Chaturthi Utsav | सार्वजनिक गणेश उत्सव

Public Ganesh Chaturthi Utsav: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) पायाभरणी केली, असे म्हटले जाते. 1890 च्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांना अनेकदा प्रश्न पडला की सामान्य लोकांना एकत्र कसे आणायचे. आणि त्याला समजले की एकत्र पूजा साजरी करणे हा मार्ग असू शकतो. महाराष्ट्रात पेशव्यांनी फार पूर्वीपासून गणपतीची पूजा करण्याची परंपरा सुरू केली होती. टिळकांनी विचार केला की, घराऐवजी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव का साजरा केल्याने लोक एकत्र येतील आणि एकतेची भावना वाढेल. तर 1893 मध्ये या महान उत्सवाचा पाया रचला गेला. मंडपांमध्ये गणपतीच्या प्रतिमा असलेले मोठे होर्डिंग लावणारा माणूस म्हणून टिळकांना श्रेय दिले जाते. जसजसे लोक एकत्र येऊ लागले तसतसे गणेशोत्सव हे स्वातंत्र्याचे एक मोठे जनआंदोलन बनले, विशेषतः वर्धा, नागपूर आणि अमरावती सारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करताना इंग्रज घाबरले होते आणि रौलट समितीच्या अहवालात गणेशोत्सवादरम्यान तरुणांच्या गटांनी रस्त्यावर उतरून ब्रिटीश राजवटीचा निषेध केला.

Ganesh Chaturthi: Ashtavinayak in Maharashtra | महाराष्ट्रातील अष्टविनायक

Ganesh Chaturthi: Ashtavinayak in Maharashtra: महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांची नावे, स्थाने व जिल्हे खालील तक्त्यात दिली आहे

अ. क्र अष्टविनायक गणपती जिल्हा
1 मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर) मोरगाव,  पुणे
2 सिद्धिविनायक सिद्धटेक, अहमदनगर
3 बल्लाळेश्वर पाली, रायगड
4 वरदविनायक महाड, रायगड
5 चिंतामणी थेऊर, पुणे
6 गिरिजात्मज लेण्याद्री, पुणे
7 विघ्नेश्वर ओझर, पुणे
8 महागणपती रांजणगाव, पुणे
Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_60.1
अष्टविनायक गणपती

मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर)

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मयूरेश्वर. मोरगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे.

सिद्धिविनायक

उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे.

बल्लाळेश्वर

बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ते चिमाजी अप्पांनी अर्पण केले आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.

वरदविनायक

श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

चिंतामणी

थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला.

गिरिजात्मज

किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता.

विघ्नेश्वर

विघ्नेश्वर श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात

महागणपती

हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना

सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,

अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

॥गणपती बाप्पा मोरया॥

___________________________________________________________________

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_70.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Ganesh Chaturthi 2022, Date, Celebration and Importance_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.