Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   मराठी व्याकरण: भाग 3 – काळ,...

मराठी व्याकरण: भाग 3 – काळ, लिंग विभक्ती, वचन, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द| Food Supply Inspector Exam : Last Minute Revision

मराठी व्याकरण: काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार: वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

  1. वर्तमान काळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

वर्तमान काळ: क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. उदा. मी पत्र लिहितो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा वर्तमानकाळ
  2. अपूर्ण वर्तमानकाळ
  3. पूर्ण वर्तमानकाळ
  4. रीती वर्तमानकाळ

साधा वर्तमानकाळ: जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. सुरेश गाणे गातो.

अपूर्ण वर्तमानकाळ: एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी अपूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. गोलू खेळत आहे.

पूर्ण वर्तमानकाळ:  नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. श्यामने पेपर सोडवला आहे.

रीती वर्तमानकाळ: वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात. उदा. माधुरी रोज डान्स क्लासला जाते.

भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी पत्र लिहिले.

भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा भूतकाळ
  2. अपूर्ण भूतकाळ
  3. पूर्ण भूतकाळ
  4. रीती भूतकाळ

साधा भूतकाळ: एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी गृहपाठ केला.

अपूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा तो वाचत होता.

पूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. तो उठला होता.

रीती भूतकाळ: भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी दररोज शेतात जात असे.

भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे  दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग होतो.

भविष्यकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  1. साधा भविष्यकाळ
  2. अपूर्ण भविष्यकाळ
  3. पूर्ण भविष्यकाळ
  4. रीती भविष्यकाळ

साधा भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो. उदा. पुढीलवर्षी मी ट्रीप ला जाईन.

अपूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी उद्या नागपुरात असेन.

पूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. याने पुस्तक वाचले असेल.

रीती भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी रोज व्यायाम करत जाईल.

मराठी व्याकरण: लिंग

लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंगी
  2. स्त्रीलिंगी
  3. नपुसकलिंगी

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

  1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते. उदा. मुलगा – मुलगी – मुलगे
  2. काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात. उदा. पाटील – पाटलीण
  3. काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात. उदा. दास – दासी
  4. काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात. उदा. सुरा – सुरी
  5. संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात. उदा जनक – जननी
  6. काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररित्या होतात. पुरुष – स्त्री
  7. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. उदा. व्याधी (स्त्री. पु.)
  8. परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात. उदा. क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
  9. सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते. उदा. साखरभात (पु.)
  10. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामाचा उल्लेख पुल्लिंगीच करतात. तर ऊ, घार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.

मराठी व्याकरण: विभक्ती

विभक्ती: नामे सर्वनाम यांचा क्रियापदाशी व इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

नामाचा क्रियापदाशी किवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात तर कार्यकार्थ एकूण सहा मानले जातात. कार्यकार्थात षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही.

विभक्ती प्रत्ययाचा तक्ता
विभक्ती विभक्तीचे प्रत्यय कारकार्थ
एकवचन अनेकवचन
प्रथमा कर्ता
व्दितीया स, ला, ते स, ला, ना, ते कर्म
तृतीय ने, ए, शी नी, शी, ई, ही करण (साधन)
चतुर्थी स, ला, ते स, ला, ना, ते संप्रदान (दान/भेट)
पंचमी ऊन, हुन ऊन, हुन अपादान (दुरावा/वियोग)
षष्टी चा, ची, चे, च्या चा, ची, चे, च्या संबंध
सप्तमी त, ई, आ त, ई, आ अधिकरण (स्थळ/वेळ)
संबोधन नो हाक

मराठी व्याकरण: वचन

वचन: नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

मराठीत दोन वचने आहेत.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

वाचनामुळे नामाच्या रुपात खालीलप्रमाणे बदल होतात.

  1. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते. उदा. राजा – राजे
  2. ‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उदा. पक्षी – पक्षी
  3. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते. उदा. गाय – गायी
  4. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते. उदा. सभा -सभा
  5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते. उदा. पिसू – पिसवा
  6. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते. उदा. भाकरी – भाकऱ्या
  7. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही. उदा. कांजण्या

मराठी व्याकरण: समानार्थी व विरुद्धार्थी शब्द

समानार्थी व विरुद्धार्थी शब्द: महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणात समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांवर नेहमी प्रश्न विचारल्या जातात.

समानार्थी शब्द: एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ समानार्थी शब्द ‘ होय.

विरुद्धार्थी शब्द: एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

मराठी शब्दसंपदा – समानार्थी शब्द

शब्द समानार्थी शब्द
सुंदर आकर्षक, मोहक, मनमोहक, चित्तवेधक, सुशोभित, शोभन, लावण्यपूर्ण, रम्य, रमणीय
मोठा विशाल, प्रचंड, विस्तीर्ण, व्यापक, प्रचुर, जास्त, अधिक
वाईट गरीब, दरिद्री, कंगाल, वंचित, दुष्ट, निकृष्ट, अधम, हीन, निकृष्ट दर्जाचा
आनंदी प्रसन्न, खुश, हर्षित, प्रफुल्लित, उत्साही, समाधानी, संतुष्ट, कृतार्थ, सुखावला
सकाळ प्रभात, भोर, प्रातःकाळ, प्रातः, प्रातःसमय
संध्याकाळ सायंकाळ, संध्या, संध्यासमय, संध्याकाल
रात्र निशा, रात्री, रात्रिकाळ, निशि, रात्रसमय
दिवस दिवसभर, दिवसाची वेळ, दिवसाचा कालावधी, दिवसा, दिवाळखोरीची वेळ
माणूस मानव, मनुष्य, मानवी व्यक्ती, पुरुष, स्त्री, मनुष्यजाती
स्त्री महिला, स्त्रीजाती, नारी, सखी, मैत्रिणी, जोडीदार
मुलगा बालक, कुमार, बाल, कनिष्ठ, किशोर, तरुण
मुलगी कन्या, कुमारी, कनिष्ठ, किशोरी, तरुणी
आई माता, जननी, 
बाप पिता, जनक, पितृ, कुलपुरुष, कुलपिता
भाऊ बंधू, सहोदर, अग्रज, ज्येष्ठ
बहीण भगिनी, सहोदरी, बहिण, कनिष्ठ, धाकटी
पती जोडीदार, जीवनसाथी
पत्नी पत्नी, जीवनसाथी, जोडीदार, अर्धांगिनी, पतिव्रता
मित्र दोस्त, सखा, सहकारी, साथी, साथीदार
शत्रू दुश्मन, वैरी, शत्रु, कट्टर शत्रू, शत्रुपक्षी
प्रेम माया, अनुराग, प्रेमभाव, प्रेमभावना
द्वेष वैर, राग, असंतोष, तिरस्कार, घृणा

मराठी शब्दसंपदा – विरुद्धार्थी शब्द

शब्द विरुद्धार्थी शब्द
सुंदर कुरूप
मोठा लहान
वाईट चांगला
आनंदी दुःखी
सकाळ संध्याकाळ
रात्र दिवस
स्त्री पुरुष
मुलगा मुलगी
आई बाप
भाऊ बहीण
पती पत्नी
मित्र शत्रू
प्रेम द्वेष
सत्य असत्य
देव दानव
जीवन मृत्यू
आनंद दुःख
धर्म अधर्म
विश्वास अविश्वास

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

काळाचे प्रमुख किती प्रकार पडतात?

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

prime_image
About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.