Marathi govt jobs   »   Study Materials   »   Daily Dose: Marathi Grammar Guru

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : विरामचिन्हे व त्यांचे उपयोग

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : विरामचिन्हे व त्यांचे उपयोग

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग

मराठीतील सर्व चिन्हे व त्यांचे उपयोग खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

.क्र. चिन्हाचे नाव चिन्ह उपयोग
1 पूर्णविराम .
  • वाक्य पूर्ण झाल्यावर किंवा शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदा. राम गावाला गेला. गो. ग. आगरकर (गोपाल गणेश आगरकर)
2 अर्धविराम ;
  • दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम वापरतात. उदा. विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.
3 स्वल्पविराम ,
  • एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरल्या जातो. उदा. माझ्याकडे उमा, महेश आणि रवि यांचे मोबाईल नंबर आहेत.
4 अपूर्णविराम
(उपपुर्णविराम)
:
  • वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास अपूर्णविरामाचा वापर होतो. उदा. पुढील आसन क्रमांकाचे उमेदवार उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18
5 प्रश्नचिन्ह ?
  • प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरल्या जाते. उदा. गोपाल कोठे गेला?
6 उद्गारवाचक चिन्ह !
  • उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक वापरल्या जाते. उदा. बापरे! केवडा मोठा साप!
7 अवतरणचिन्ह ” ”     ‘ ‘
  • दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता वापरतात.
  • एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास किंवा दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना वापरतात. उदा. तो म्हणाला, “मी बाहेर जाईन.”
8. संयोगचिन्ह
  • दोन शब्द जोडतांना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात, उदा. क्रिडा-संकुल
9 अपसरण चिन्ह
(डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)
  • बोलतांना विचारमाला तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्ह वापरतात.
10 विकल्प चिन्ह /
  • एखाधा शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात. उदा. मी रेल्वेने/बसने जाईन.

आजचा प्रश्न 

Q.अपूर्ण विराम केव्हा वापरतात?

  1. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास
  2. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी
  3. दोन वाक्य जोडताना
  4. वाक्य पूर्ण झाल्यावर

तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा.

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : विरामचिन्हे व त्यांचे उपयोग_3.1   Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : विरामचिन्हे व त्यांचे उपयोग_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : विरामचिन्हे व त्यांचे उपयोग_6.1
About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.