Marathi govt jobs   »   Study Materials   »   Daily Dose: Marathi Grammar Guru

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : प्रयोग

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : प्रयोग

प्रयोग

प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किं पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही.

प्रयोगाचे प्रकार 

मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग: जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात. उदा.

श्याम      गाणे        गातो.

(कर्ता)   (कर्म)   (क्रियापद)

आता यात कर्ता बदलला तर,  सीता गाणे गाते. (कर्ता बदलला की क्रियापद बदलेल.)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

  1. सकर्मक कर्तरी प्रयोग
  2. अकर्मक कर्तरी प्रयोग

1. सकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. राम बैल बांधतो.

2. अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. सारे पोपट उडाले.

कर्मणी प्रयोग (Passive Voice): क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात. उदा. रामने बैल बांधला.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

  1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
  2. नवीन कर्मणी प्रयोग
  3. समापन कर्मणी प्रयोग
  4. शक्य कर्मणी प्रयोग
  5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. नळे इंद्रासी असे बोलिजेले.

नवीन कर्मणी प्रयोग: ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात. उदा. कंस कृष्णाकडून मारला गेला.

समापन कर्मणी प्रयोग: ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला/झाली या प्रकारचे असते. उदा. त्याचा गृहपाठ करून झाला.

शक्य कर्मणी प्रयोग: जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मुलाच्याने धावले जाते.

प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग: कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. त्याने पत्र लिहीले.

भावे प्रयोग: जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. रामने बैलाला बांधले.

भावे प्रयोगाचे दोन उपप्रकर पडतात.

  1. सकर्मक भावे प्रयोग
  2. अकर्मक भावे प्रयोग

सकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदा. रामाने रावणास मारले.

अकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदा.  मुलांनी खेळावे.

भावकर्तरी प्रयोग:  भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. आता सांजावले. (सायंकाळ झाली.)

मिश्र किंवा संकर प्रयोग: एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण असल्यास त्याला संकर प्रयोग म्हणतात.

कर्तृ-कर्मसंकर: ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म अशा दोन्हींनुसार बदलते, त्यास कर्तृ-कर्मसंकर असे म्हणतात.

कर्म भाव संकर: कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. क्रियापद कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते.

कर्तृ- भावसंकर:या प्रयोगात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्यांच्या वचनानुसार क्रियापद बदलते.

आजचा प्रश्न 

Q.“न्यायाधिशाकडून दंड करण्यात आला” या प्रयोगाचे नाव सांगा.

(a)   कर्तरी प्रयोग

(b)  भावे प्रयोग

(c)   समापन कर्मणी प्रयोग

(d)  नवीन कर्मणी प्रयोग

तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा.

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : प्रयोग_3.1   Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : प्रयोग_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Daily Dose: Marathi Grammar Guru : दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : प्रयोग_6.1

FAQs

मराठी व्याकरण मला कोठे शिकायला मिळेल ?

मराठी व्याकरण तुम्हाला या लेखांमध्ये शिकायला मिळेल.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.