Marathi govt jobs   »   United Kingdom reports cases of ‘Norovirus’...

United Kingdom reports cases of ‘Norovirus’ infection | युनायटेड किंगडममध्ये ‘नॉरोव्हायरस’ संसर्गाची नोंद

United Kingdom reports cases of ‘Norovirus’ infection | युनायटेड किंगडममध्ये ‘नॉरोव्हायरस’ संसर्गाची नोंद
युनायटेड किंगडममध्ये ‘नॉरोव्हायरस’ संसर्गाची नोंद

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

युनायटेड किंगडममध्ये ‘नॉरोव्हायरस’ संसर्गाची नोंद

युनायटेड किंगडम मध्ये आता नॉरो विषाणूचा उद्रेक झाला असून जवळपास 154 लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) ने दिली. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) नुसार नॉरोविषाणू अतिशय संसर्गजन्य असून त्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. नॉरो विषाणूची उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि मळमळ तसेच आतड्यांमधून किंवा पोटात जळजळ (तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस) ही लक्षणे आहेत. डोकेदुखी, ताप आणि शरीर वेदना ही या विषाणूची इतर लक्षणे आहेत. लोकांमध्ये सामान्यत: 12 ते 48 तासांच्या आत लक्षणे विकसित होतात आणि ती 1 ते 3 दिवसांपर्यंत टिकू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युनायटेड किंगडमचे पंतप्रधान: बोरिस जॉनसन
  • युनायटेड किंगडमची राजधानी: लंडन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!