Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

UNICEF India, Facebook to make a safer online world for children | युनिसेफ इंडिया, फेसबुक मुलांसाठी सुरक्षित ऑनलाइन जग निर्माण करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

युनिसेफ इंडिया, फेसबुक मुलांसाठी सुरक्षित ऑनलाइन जग निर्माण करणार

युनिसेफ इंडिया आणि फेसबुकने ऑनलाईन सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करत मुलांवरील हिंसाचार नष्ट करण्यासाठी एक वर्षाचा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.हा प्रकल्प मुलांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलांची लवचिकता आणि त्यांची डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरण्याची क्षमता सुधारणे, मुलांविरूद्ध हिंसा आणि त्याचा मुलांवर, कुटुंबांवर आणि समुदायावर होणाऱ्या परिणामांविषयी जागृती निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या भागीदारीमध्ये देशभरातील सोशल मीडिया मोहीम आणि 100,000 शालेय मुलांसाठी ऑनलाइन सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि मानसशास्त्रीय समर्थनासाठी क्षमता वाढवणे समाविष्ट आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे लहान मुलांवरील हिंसाचार नष्ट करण्याच्या चळवळीचे सदिछादूत आयुष्मान खुराना यांनी आभासी कार्यक्रमादरम्यान या प्रकल्पासाठी आपला मुख्य संदेश दिला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • युनिसेफ मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
  • युनिसेफचे कार्यकारी संचालक: हेन्रीएटा एच. फोर
  • युनिसेफची स्थापना: 11 डिसेंबर 1946
  • फेसबुकची स्थापना: फेब्रुवारी 2004
  • फेसबुक सीईओ: मार्क झुकरबर्ग
  • फेसबुक मुख्यालय: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!