Marathi govt jobs   »   शिक्षक भरती 2024   »   शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024, 2-3 दिवसात निवड याद्या लागणार

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024: पवित्र पोर्टलवर दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी निवड याद्यांसंबंधित प्रसिद्धीपत्रक जारी झाले आहे. ज्यानुसार पुढील 2-3 दिवसात पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती च्या निवड याद्या जाहीर करण्यात येतील. दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी, महानगरपालीकांनी व तसेच खाजगी अनुदानित शाळांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2024 साठी अधिसुचना जाहीर केली होती. या लेखात शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती पहा.

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024: विहंगावलोकन

पवित्र पोर्टलवर दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी निवड याद्यांसंबंधित प्रसिद्धीपत्रक जारी झाले असून शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग शिक्षण विभाग 
भरतीचे नाव शिक्षक भरती 2024
एकूण रिक्त पदे 21678
निकारीचे ठिकाण महाराष्ट्र

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024 

शिक्षण विभागाने, 24/02/2024 रोजी पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती 2024 बद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. उमेदवार खाली ते प्रसिद्धीपत्रक पाहू शकतात.

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024
शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024

शिक्षक भरती 2024: अधिसुचना

पवित्र पोर्टल वर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी अनुदानित शाळा यांनी शिक्षक भरती साठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसुचना डाउनलोड करू शकतात.

शिक्षक भरती 2024: अधिसुचना PDF

शिक्षक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील

पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:

1) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती-3147, अनुसूचित जमाती-3542, विमुक्त जाती (अ)- 862, भटक्या जमाती (व)-404, भटक्या जमाती (क)-582, भटक्या जमाती (ड)-493, विशेष मागास प्रवर्ग-290, इतर मागास प्रवर्ग-4024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -2324, खुला-6170 याप्रमाणे आहेत. तथापि, काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.

2) गट निहाय रिक्त पदे- इ. 1 ते 5 वी -10240, इ. 6 ते 8 वी 8127, इ. 9 ते 10 वी -2176, इ. 11 ते 12 वी – 1135 याप्रमाणे आहेत.

3) माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-18373, इंग्रजी-931, उर्दू-1850, हिन्दी-410, गुजराथी-12, कन्नड-88, तामिळ-8, वंगाली-4, तेलुगू-2 याप्रमाणे आहेत.

4) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-16799, मुलाखतीसह-4879 याप्रमाणे आहेत.

शिक्षक भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  
प्रवर्ग पद संख्या 
अजा 3147
अज 3542
विजा 862
भज(ब) 404
भज(क) 582
भज(ड) 493
विमाप्र 290
इमाव 4024
इडब्ल्यूएस 2324
अराखीव 6170
  21678

शिक्षक भरती 2024: पात्रता निकष

1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.

3. इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.

4. इ.6 वी ते इ.8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7. इ. 9 वी ते इ 10 वी /इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीम प्रविष्ट असणे आवश्यक आहे.

8. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी मर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. मदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शामन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024, 2-3 दिवसात निवड याद्या लागणार_5.1

FAQs

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024 कधी जाहीर झाले?

शिक्षक भरती प्रसिद्धीपत्रक 2024 24 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

शिक्षक भरती 2024 साठी कोणते पोर्टल उपलब्ध आहे?

शिक्षक भरती 2024 साठी पवित्र पोर्टल उपलब्ध आहे.

शिक्षक भरती च्या निवड याद्या कधी जाहीर करण्यात येतील?

पुढील 2-3 दिवसात पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती च्या निवड याद्या जाहीर करण्यात येतील.