Table of Contents
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024: मृद व जलसंधारण विभागाने दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 जाहीर केली होती. SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार होती. परंतु मृदा व जलसंधारण विभागाने दि. 15 मार्च 2024 रोजी SWCD भरती प्रक्रिया 2024 रद्द करण्याचा निर्णय घेतला.तसेच आता SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 जाहीर झाली आहे. या लेखात आपण SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | मृद व जलसंधारण विभाग |
भरतीचे नाव |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) |
एकूण पदे | 670 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://swcd.maharashtra.gov.in/ |
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख | 14,15 व 16 जुलेे 2024 |
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024: अधिकृत सूचना
WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवार सदर सुचना खाली पाहू शकतात.
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24: महत्वाच्या तारखा | |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसूचना | 21 डिसेंबर 2023 |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात | 21 डिसेंबर 2023 |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
10 जानेवारी 2024 |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख | 14,15 व 16 जुलेे 2024 |
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप
- सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
- संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | माध्यम | कालावधी |
1 | मराठी भाषा | 10 | 20 | मराठी | 2 तास |
2 | इंग्रजी भाषा | 10 | 20 | इंग्रजी | |
3 | सामान्य ज्ञान | 10 | 20 | मराठी व इंग्रजी | |
4 | बुद्धीमापन चाचणी | 10 | 20 | ||
5 | तांत्रिक प्रश्न | 60 | 120 | इंग्रजी | |
एकूण | 100 | 200 |
सदर परिक्षा हि संगणक आधारीत (Computer Based Online Examination) घेण्यात येणार असुन प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रीका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असुन एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रीकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे (Normalisation) पध्दतीने गुणांक निश्चीत करुन निकाल जाहीर करण्यात येईल. सदर समाणीकरण (Normalisation) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहिल. याची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. सदर समाणीकरण (Normalisation) सुत्र माहितीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2024 अभ्यासक्रम
अ.क्र | विषयाचे नाव | अभ्यासक्रम |
1. | स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा स्तर |
|
2. | मराठी | मराठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांचा अर्थ आणि वापर तसेच सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार आणि उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. |
3. | इंग्रजी | Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. |
4. | सामान्य ज्ञान | चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतीय) इतिहास विशेषतः महाराष्ट्र, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय सरकार आणि पर्यावरण. |
5. | बुद्धीमापक चाचणी | किती लवकर आणि अचूकपणे उमेदवार विचार करू शकतो |
मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – मे 2024
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक