Marathi govt jobs   »   Study Materials   »   समाजसुधारक : संत गाडगेबाबा

MPSC Shorts | Group B and C |समाजसुधारक : संत गाडगेबाबा|Social reformer: Saint Gadge Baba

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय इतिहास
टॉपिक समाजसुधारक : संत गाडगेबाबा

समाजसुधारक : संत गाडगेबाबा

मूळ नाव : डेबूजी झिंगराजी जानोरकर

जन्म : 23 फेब्रुवारी 1876

निधन : 20 डिसेंबर 1956

  • बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना गुरु मानत परमार्थाचा मार्ग स्वीकारला.
  • सदैव हातात गाडगे घेऊन फिरत म्हणून लोक त्यांना ‘गाडगे महाराज’ म्हणू लागले. तर कुणी त्यांना ‘चापरे महाराज’ तर कुणी ‘गोधडे महाराज’ म्हणू लागले.
  • ‘मी कुणाचा गुरु नाही व माझा कुणी शिष्य नाही’ असे म्हणून त्यांनी कोणत्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
  • 1906 साली ऋणमोचनला बाबांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. यात्रेत येणारे भाविक पूर्णा नदीच्या घाटावरुन घसरुन पडायचे म्हणून बाबांनी पूर्णा नदीला दगडाचा पक्का घाट बांधून दिला.
  • कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबांनी आळंदीत कुष्ठधाम सुरु केला.
  • पंढरपूर वारीला आल्यावर  वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबांनी 1917 साली चोखामेळा धर्मशाळेची बांधणी केली. (आर्थिक मदत गुजरातमधील स्वामी अखंडानंद  25 हजार रु.)  (धर्मशाळेची जबाबदारी : गणपतराव गांगण यांवर)
  • मुर्तिजापूरमध्ये बाबांनी गोरक्षण संस्थेची स्थापना केली.(मदत तुकाराम तिडके व नानासाहेब जमादार)
  • मराठा धर्मशाळा(1920) आणि सदावर्त (1922) सुरु करुन त्यांनी दीन दुबळ्यांची सोय केली.
  • कोयना धरणाच्या भूमिपूजनाचा मान सरकारने बाबांना दिला होता.
  • डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या श्री जगदंबा कुष्ठनिवास या कुष्ठरोगी आधारगृहात बाबा सेवा करत.
  • 1937 साली नाशिकच्या नगरपालिका मैदानावर गाडगेबाबांचे कीर्तन झाले.  (विषय : ‘शिका आणि शिकवा‘)

गौरवोद्गार :

  • आचार्य अत्रे – ‘सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात’ ;                            ‘गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड मोठे व्यासपीठ होते.’
  • गो. नी. दांडेकर – ‘गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्नीकुंडाची कहाणी आहे.’

गाडगेबाबांवरील चित्रपट :  डेबू ;  देवकीनंदन गोपाळा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

MPSC Shorts | Group B and C |समाजसुधारक : संत गाडगेबाबा|Social reformer: Saint Gadge Baba_4.1