Marathi govt jobs   »   Social Reformer : saint Gadagebaba |...

Social Reformer : saint Gadagebaba | समाजसुधारक : संत गाडगेबाबा

Table of Contents

Social Reformer : saint Gadagebaba | समाजसुधारक : संत गाडगेबाबा_2.1

संत गाडगेबाबा

मूळ नाव : डेबूजी झिंगराजी जानोरकर

जन्म : 23 फेब्रुवारी 1876

निधन : 20 डिसेंबर 1956

  • बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना गुरु मानत परमार्थाचा मार्ग स्वीकारला.
  • सदैव हातात गाडगे घेऊन फिरत म्हणून लोक त्यांना ‘गाडगे महाराज’ म्हणू लागले. तर कुणी त्यांना ‘चापरे महाराज’ तर कुणी ‘गोधडे महाराज’ म्हणू लागले.
  • ‘मी कुणाचा गुरु नाही व माझा कुणी शिष्य नाही’ असे म्हणून त्यांनी कोणत्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

Social Reformer : saint Gadagebaba | समाजसुधारक : संत गाडगेबाबा_3.1

  • 1906 साली ऋणमोचनला बाबांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. यात्रेत येणारे भाविक पूर्णा नदीच्या घाटावरुन घसरुन पडायचे म्हणून बाबांनी पूर्णा नदीला दगडाचा पक्का घाट बांधून दिला.
  • कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबांनी आळंदीत कुष्ठधाम सुरु केला.
  • पंढरपूर वारीला आल्यावर  वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबांनी 1917 साली चोखामेळा धर्मशाळेची बांधणी केली. (आर्थिक मदत गुजरातमधील स्वामी अखंडानंद  25 हजार रु.)  (धर्मशाळेची जबाबदारी : गणपतराव गांगण यांवर)
  • मुर्तिजापूरमध्ये बाबांनी गोरक्षण संस्थेची स्थापना केली.(मदत तुकाराम तिडके व नानासाहेब जमादार)
  • मराठा धर्मशाळा(1920) आणि सदावर्त (1922) सुरु करुन त्यांनी दीन दुबळ्यांची सोय केली.
  • कोयना धरणाच्या भूमिपूजनाचा मान सरकारने बाबांना दिला होता.
  • डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या श्री जगदंबा कुष्ठनिवास या कुष्ठरोगी आधारगृहात बाबा सेवा करत.
  • 1937 साली नाशिकच्या नगरपालिका मैदानावर गाडगेबाबांचे कीर्तन झाले.  (विषय : ‘शिका आणि शिकवा‘)

महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य

 

गौरवोद्गार :

  • आचार्य अत्रे – ‘सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात’ ;                            ‘गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड मोठे व्यासपीठ होते.’
  • गो. नी. दांडेकर – ‘गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्नीकुंडाची कहाणी आहे.’

गाडगेबाबांवरील चित्रपट :  डेबू ;  देवकीनंदन गोपाळा

Social Reformer : saint Gadagebaba | समाजसुधारक : संत गाडगेबाबा_4.1

Sharing is caring!