संत गाडगेबाबा
मूळ नाव : डेबूजी झिंगराजी जानोरकर
जन्म : 23 फेब्रुवारी 1876
निधन : 20 डिसेंबर 1956
- बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना गुरु मानत परमार्थाचा मार्ग स्वीकारला.
- सदैव हातात गाडगे घेऊन फिरत म्हणून लोक त्यांना ‘गाडगे महाराज’ म्हणू लागले. तर कुणी त्यांना ‘चापरे महाराज’ तर कुणी ‘गोधडे महाराज’ म्हणू लागले.
- ‘मी कुणाचा गुरु नाही व माझा कुणी शिष्य नाही’ असे म्हणून त्यांनी कोणत्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
- 1906 साली ऋणमोचनला बाबांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. यात्रेत येणारे भाविक पूर्णा नदीच्या घाटावरुन घसरुन पडायचे म्हणून बाबांनी पूर्णा नदीला दगडाचा पक्का घाट बांधून दिला.
- कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबांनी आळंदीत कुष्ठधाम सुरु केला.
- पंढरपूर वारीला आल्यावर वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबांनी 1917 साली चोखामेळा धर्मशाळेची बांधणी केली. (आर्थिक मदत गुजरातमधील स्वामी अखंडानंद 25 हजार रु.) (धर्मशाळेची जबाबदारी : गणपतराव गांगण यांवर)
- मुर्तिजापूरमध्ये बाबांनी गोरक्षण संस्थेची स्थापना केली.(मदत तुकाराम तिडके व नानासाहेब जमादार)
- मराठा धर्मशाळा(1920) आणि सदावर्त (1922) सुरु करुन त्यांनी दीन दुबळ्यांची सोय केली.
- कोयना धरणाच्या भूमिपूजनाचा मान सरकारने बाबांना दिला होता.
- डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या श्री जगदंबा कुष्ठनिवास या कुष्ठरोगी आधारगृहात बाबा सेवा करत.
- 1937 साली नाशिकच्या नगरपालिका मैदानावर गाडगेबाबांचे कीर्तन झाले. (विषय : ‘शिका आणि शिकवा‘)
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
गौरवोद्गार :
- आचार्य अत्रे – ‘सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात’ ; ‘गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड मोठे व्यासपीठ होते.’
- गो. नी. दांडेकर – ‘गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्नीकुंडाची कहाणी आहे.’
गाडगेबाबांवरील चित्रपट : डेबू ; देवकीनंदन गोपाळा