Marathi govt jobs   »   Social Reformer : Raja Ram Mohan...

Social Reformer : Raja Ram Mohan Roy | समाजसुधारक : राजा राम मोहन रॉय

Social Reformer : Raja Ram Mohan Roy | समाजसुधारक : राजा राम मोहन रॉय_2.1

समाजसुधारक : राजा राम मोहन रॉय

  • जन्म : 22 मे 1772  राधानगरी (पश्चिम बंगाल )
  • निधन : 27 सप्टेंबर 1833
  • रॉय यांचे मुळ आडनाव बॅनर्जी होते.
  • रॉय यांनी तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला.
  • वयाच्या पंधराव्या वर्षीच हिन्दुधर्मातील मुर्तीपुजेवर टीका करणारी एक पुस्तिका बंगाली भाषेत लिहीली होती.
  • इ.स. 1801 मध्ये रॉय यांनी पार्शियन भाषेत तुहफत – उल – मुवाउद्दीन (एकेश्वरवाद्यांचा नजराणा) हा ग्रंथ लिहिला.
  • ईस्ट इंडिया कंपनीत 1814 पर्यंत दिवाण म्हणून नोकरी केली.
  • 1815 साली राजा राम मोहन रॉय यांनी ‘भारतीय सभेची’ स्थापना केली. (मदत: द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, शंकर घोषाल, आनंद बॅनर्जी, डॉ. राजेंद्रलाल मिश्रा)
  • इ.स. 1815 मध्ये ‘एकेश्वरवादाचा’ प्रसार करण्यासाठी आत्मीय सभेची स्थापना. ( प्रसार व प्रचारासाठी इंग्रजी भाषेचा वापर)
  • इ.स. 1817 : कलकत्ता येथे इंग्रजी शाळा सुरु केली. (मदत : सर डेव्हीड हेअर)
  • इ.स. 1821 मध्ये रॉय यांना ख्रिस्ती धर्म स्विकारण्याचा उपदेश बिशप मिडलटन यांनी दिला होता.
  • इ.स. 1821 मध्ये ‘बायबल’चे बंगाली मध्ये भाषांतर केले.

Social Reformer : Raja Ram Mohan Roy | समाजसुधारक : राजा राम मोहन रॉय_3.1

  • इ.स. 1823 :  कलकत्ता येथे ‘हिन्दु कॉलेज’ निर्माण केले. (मदत : सर डेव्हीड हेअर)
  • इ.स. 1826 : कलकत्त्याला ‘वेदांत कॉलेज’ व  ‘अँग्लो उर्दु स्कुल’ ची स्थापना.
  • इ.स. 1827 मध्ये रॉय यांनी ब्रिटीश इंडिया युनिटेरीयन असोसिएशन’ ची स्थापना केली
  • 20 ऑगस्ट 1828 ला त्यांनी ‘ब्राम्हो समाज’ स्थापना.( पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती)
  • 4 डिसेंबर 1829 : सती बंदी  कायदा.( लॉर्ड बेंटीक यांनी रॉय यांच्या प्रयत्नामुळे)
  • इ.स. 1830-31 मध्ये दिल्लीचा मोगल बादशहा अकबर द्वितीय याची बंद पडलेली पेन्शन पुन्हा सुरु व्हावी म्हणुन रॉय इंग्लंडला गेले. ( अकबर द्वितीय ने रॉय यांना ‘राजा’ हा किताब दिला).
  • इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सिलेक्ट कमेटी पुढे रॉय यांनी साक्ष दिली. (हाऊस ऑफ कॉमन्स ला साक्ष देणारे प्रथम भारतीय)
  •  रॉय यांनी वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर इंग्रजीत केले.
  • रॉय यांनी उपनिषदांवर आधारित ‘वेदांतसार’ हा ग्रंथ लिहिला.
  • रॉय यांनी उपनिषदांचे बंगाली व इंग्रजीत भाषांतर केले.
  • रॉय यांनी ‘डिरोजिओ चळवळ’ ही सुधारणावादी चळवळ राबविली. (डेव्हीड हेअर यांच्या मदतीने)
  • राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्युनंतर ब्राम्हो समाजातील दर आठवड्याच्या प्रार्थना रामचंद्र विद्याबागीश घेत असत.

महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य

स्थापन केलेली वृत्तपत्रे :- ‘संवाद कौमुदी’ (4 डिसेंबर 1821), ‘ब्रम्हनिकल मॅग्झीन’, ‘समाचार चंडीका’, ‘बेंगॉल हेरॉल्ड’, ‘मिरत-उल-अखबार’ (पारशी भाषेत).

  • बेन्थेम यांनी रॉय यांचा ‘मानव जातीचे सेवक’ असा गौरव केला.
  • रॉय यांना ‘नव्या युगाचे दुत’, ‘भारतीय प्रबोधनाचे जनक’, ‘भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक’ (Father of Indian Renaissance), ‘आधुनिक भारताचे अग्रदुत’ (Herald of New India) म्हणून गौरविण्यात येते.

Sharing is caring!