शिवराम जनबा कांबळे | Shivram Janba Kamble
- शिवराम कांबळे यांचे वडील जनबा कांबळे हे पुण्यातील भांबुर्डे या गावचे महार वतनदार होते.
- त्यांनी दलितांसाठी अनेक कार्ये केली.
- 1902 मध्ये त्यांनी ‘मराठा’ व ‘दिनबंधू’ या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यतेविरोधी लेख लिहिले.
- पूर्णपणे स्वतःचे अग्रलेख लिहिणारे पहिले दलित पत्रकार.
- मुरुळी, जोगतिणी व देवदासी यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.
- शिवराम कांबळे यांनी सासवड येथे इ. स. 1903 मध्ये 51 गावातील महार लोकांची सभा बोलावली होती.
- जुन्या अंधश्रद्धा व रुढी यांना कवटाळून राष्ट्र उद्धाराच्या मुळावर घाव घालू नये अशा शब्दांमध्ये त्यांनी तत्कालीन सुशिक्षित पदवीधर व तथाकथित विचारवंत व अस्पृश्य उद्धाराच्या चळवळीकडे उपेक्षेने पाहणाऱ्या लोकांना फटकारले.
- त्यांनी इ.स. 1908 – 1910 या काळात सोमवंशीय मित्र नावाचे मासिक चालु केले.
- शिवराम कांबळे यांनी सन 1910 मध्ये आपल्या मागण्यांसाठी संसदेला अर्ज सादर केला.
- त्यांनी वाचनालये चालू केली.
- महात्मा फुले व बाबा पदमनजी यांच्या लेखांतून प्रेरणा घेऊन शिवराम जनबा कांबळे यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला.
- हिंदू समाजाची पुनर्बांधणी करायची असेल तर उच्चवर्णीयांनी पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
- शिवराम जनबा कांबळे यांनी सन 1904 मध्ये भारतातील पहिली दलित समाज संघटित करणारी संस्था ‘श्री. शंकर प्रसादकीय सोमवंशी हितचिंतक मित्रसमाज’ नावाची संस्था स्थापन केली.
- त्यांच्यावर गोपाळ बाबा वलंगकर, महात्मा फुले, बाबा पद्मनजी, लोकहितवादी आगरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता.
- सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यात पर्वती मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्त्व शिवराम जनबा कांबळे यांनी केले.
|

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
महाराष्ट्र अभ्यास साहित्य
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
Sharing is caring!