Table of Contents
शिक्षक भरती निवड यादी 2024
शिक्षक भरती निवड यादी 2024: पवित्र पोर्टलवर दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जारी झाली आहे. दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी, महानगरपालीकांनी व तसेच खाजगी अनुदानित शाळांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2024 साठी अधिसुचना जाहीर केली होती. या लेखात शिक्षक भरती निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती पहा.
शिक्षक भरती निवड यादी 2024: विहंगावलोकन
पवित्र पोर्टलवर दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी निवड यादी जारी झाली असून शिक्षक भरती निवड यादी 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
शिक्षक भरती निवड यादी 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | शिक्षण विभाग |
भरतीचे नाव | शिक्षक भरती 2024 |
एकूण रिक्त पदे | 21678 |
निकारीचे ठिकाण | महाराष्ट्र |
शिक्षक भरती निवड यादी 2024
शिक्षण विभागाने, 25/02/2024 रोजी पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती निवड यादी 2024 बद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. उमेदवार खाली ते प्रसिद्धीपत्रक पाहू शकतात.
शिक्षक भरती निवड यादी 2024 PDF
पवित्र पोर्टल वर दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जारी झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निवड यादी PDF डाउनलोड करू शकतात.
शिक्षक भरती निवड यादी 2024 PDF (ZP शाळा)
शिक्षक भरती निवड यादी 2024 PDF (खाजगी शाळा)
शिक्षक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:
1) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती-3147, अनुसूचित जमाती-3542, विमुक्त जाती (अ)- 862, भटक्या जमाती (व)-404, भटक्या जमाती (क)-582, भटक्या जमाती (ड)-493, विशेष मागास प्रवर्ग-290, इतर मागास प्रवर्ग-4024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -2324, खुला-6170 याप्रमाणे आहेत. तथापि, काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.
2) गट निहाय रिक्त पदे- इ. 1 ते 5 वी -10240, इ. 6 ते 8 वी 8127, इ. 9 ते 10 वी -2176, इ. 11 ते 12 वी – 1135 याप्रमाणे आहेत.
3) माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-18373, इंग्रजी-931, उर्दू-1850, हिन्दी-410, गुजराथी-12, कन्नड-88, तामिळ-8, वंगाली-4, तेलुगू-2 याप्रमाणे आहेत.
4) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-16799, मुलाखतीसह-4879 याप्रमाणे आहेत.
शिक्षक भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील | |
प्रवर्ग | पद संख्या |
अजा | 3147 |
अज | 3542 |
विजा | 862 |
भज(ब) | 404 |
भज(क) | 582 |
भज(ड) | 493 |
विमाप्र | 290 |
इमाव | 4024 |
इडब्ल्यूएस | 2324 |
अराखीव | 6170 |
21678 |
शिक्षक भरती 2024: पात्रता निकष
1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
3. इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
4. इ.6 वी ते इ.8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7. इ. 9 वी ते इ 10 वी /इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीम प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
8. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी मर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. मदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शामन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.