Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

RBI to penalise banks banks if ATMs run out of cash | एटीएममधील रोकड संपली असल्यास बँकांना दंड

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एटीएममधील रोकड संपली असल्यास बँकांना दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ‘एटीएम मध्ये रोकड नसल्यास दंड योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यानुसार ती एटीएम/डब्ल्यूएलएजवर रोख दंड आकारणार आहे.एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे जनतेला होणाऱ्या गैरसोयीबद्दल उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने अशा मशीनमध्ये चलनी नोटा वेळेवर भरण्यास अपयशी ठरल्याबद्दल बँकांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 01 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल. एका महिन्यात दहा तासांपेक्षा जास्त एटीएममध्ये कॅश-आउट (रोकडविरहित) झाल्यास प्रत्येक एटीएमवर ₹ 10,000/- चा दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) च्या बाबतीत, दंड त्या बँकेला आकारला जाईल जो त्या विशिष्ट डब्ल्यूएलएची रोख आवश्यकता पूर्ण करत आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तिकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!