Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

RBI hikes collateral-free loans to Self Help Groups | आरबीआयने बचत गटांना तारण-मुक्त कर्जाची मर्यादा वाढविली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आरबीआयने बचत गटांना तारण-मुक्त कर्जाची मर्यादा वाढविली

भारतीय रिझर्व्ह बँकेने डीएवाय-एनआरएलएम (दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन) अंतर्गत स्वयं-सहायता गटांना (एसएचजी) तारण-मुक्त कर्जाची मर्यादा रु. 10 लाख वरून रु. 20 लाख केली आहे. डीएवाय-एनआरएलएम हा सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे ज्याद्वारे गरीब, विशेषत: महिलांसाठी सक्षम संस्था उभारणे आणि या संस्थांना आर्थिक सेवा आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून गरीबी कमी करण्यास मदत केली जाते. बचत गटांनी घेतलेल्या संपूर्ण कर्जाला सूक्ष्म उद्योग पत हमी योजने अंतर्गत संरक्षण प्राप्त होणार आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (एमओआरडी) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने (एसजीएसवाय) ची पुनर्रचना करून राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) सुरू केले.  29 मार्च 2016 पासून एनआरएलएम ला दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन असे नाव देण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!