Table of Contents
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024: दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस विभागाने एक पत्र जारी केले आहे ज्यानुसार 01 मार्च 2024 रोजी पोलीस भरती अधिसुचना जाहीर होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलामधील विविध घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील एकूण 17471 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती याआधी गृह विभागाने दिली होती. त्यामुळे राज्यात लवकरच पोलीस शिपाई पदासाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. या लेखात पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024: विहंगावलोकन
दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस विभागाने एक पत्र जारी केले आहे ज्यानुसार 01 मार्च 2024 रोजी पोलीस भरती अधिसुचना जाहीर होणार आहे. पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव | पोलीस भरती 2024 |
पदे | पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई |
एकूण रिक्त पदे | 17471 |
अधिसुचना प्रकाशन | 01 मार्च 2024 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 05 मार्च 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 31 मार्च 2024 |
निकारीचे ठिकाण | महाराष्ट्र |
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024: अधिकृत पत्र
पोलीस विभागाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक पत्र जारी केले आहे ज्यानुसार 01 मार्च 2024 रोजी पोलीस भरती अधिसुचना जाहीर होणार आहे. उमेदवार सदर पत्र खाली पाहू शकतात.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
- उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024. mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
- उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
- उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा हो सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाव विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आबेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल, निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल, शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.10.12.2020 नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
- पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेलो प्रमाणपत्र / कागदपत्र, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबावतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदर जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी, तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परीस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
पोलीस भरती 2024 अधिकृत पत्र PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.