Table of Contents
व्हर्च्युअल इंडिया-ईयू नेतेमंडळींच्या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी
संकरित स्वरुपात आयोजित भारत-ईयू नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. भारत-युरोपियन संघाच्या नेत्यांची बैठक पोर्तुगाल आयोजित करते. पोर्तुगालकडे सध्या ग्रुपचे अध्यक्षपद आहे. युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष श्री चार्ल्स मिशेल यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमास हजेरी लावली.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
सर्व 27 ईयू सदस्य देशांचे नेते तसेच युरोपियन परिषद आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. EU + 27 स्वरूपात ईयूने प्रथमच भारताशी बैठक आयोजित केली.
या बैठकीत भारताची ठळक वैशिष्ट्ये :
- लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेच्या सामायिक बांधिलकीवर आधारित भारत-ईयू रणनीतिक भागीदारीला आणखी बळकटी देण्याचा प्रस्ताव होता.
- समतोल व सर्वसमावेशक मुक्त व्यापार (एफटीए) आणि गुंतवणुकीच्या करारासाठी बोलणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.
चर्चेत तीन प्रमुख विषयांचा समावेश:
- परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा;
- कोविड -19, हवामान आणि वातावरण;
- व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान.
- डिजिटल, ऊर्जा, वाहतूक आणि लोक-जन संपर्क वाढविण्यावर भर म्हणून भारत-ईयू दरम्यान महत्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक ‘कनेक्टिव्हिटी पार्टनरशिप’ सुरू करण्यात आले.
- पुणे मेट्रो रेल प्रकल्पासाठी भारतीय अर्थ मंत्रालय आणि युरोपियन गुंतवणूक बँकेने 150 दशलक्ष युरोच्या वित्त करारावरही स्वाक्षरी केली.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:
- युरोपियन परिषद स्थापना : 9 डिसेंबर 1974;
- युरोपियन युनियन मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम;
- युरोपियन संघ स्थापना : 1 नोव्हेंबर 1993.