Table of Contents
पद्म पुरस्कार विजेते भारतीय इस्लामिक विद्वान आणि शांतता कार्यकर्ते मौलाना वहीदुद्दीन खान यांचे निधन
प्रख्यात भारतीय इस्लामिक विद्वान, अध्यात्मिक नेते आणि लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांचे कोविड –19 आजारामुळे निधन झाले आहे. त्यांनी इस्लामच्या अनेक बाबींवर 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि कुराण व त्याचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांतर यावर भाष्य लिहिलेले होते. पद्म विभूषण (2021), पद्मभूषण (2000) आणि राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार (2009) अशा अनेक उल्लेखनीय सन्मानांचे ते मानकरी होते.