Marathi govt jobs   »   National Statistics day celebrated on 29th...

National Statistics day celebrated on 29th June I 29 जून: राष्ट्रीय सांख्यिकी दिन

National Statistics day celebrated on 29th June I 29 जून: राष्ट्रीय सांख्यिकी दिन_2.1

 

29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन 

प्रा. पी सी महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकार दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून आयोजित करते. सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीसाठी सांख्यिकी असलेले महत्त्व तरुणांना पटवून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. दैनंदिन आयुष्यात सांख्यिकी चा वापर आणि महत्त्व वाढविणे हा देखील या दिवसाचा उद्देश आहे.

2021 ची संकल्पना: “एसडीजी 2 – उपासमार दूर करणे, अन्नसुरक्षा प्राप्त करणे, पोषणात वाढ करणे व शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे.”

राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची पार्श्वभूमी:

हा दिवस पहिल्यांदा 29 जून 2007 रोजी साजरा करण्यात आला. दिवंगत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा विचार करून भारत सरकारने हा दिवस पाळण्याचे ठरविले.

प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्याविषयी: 

29 जून 1893 रोजी जन्मलेले प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जातात. दोन डेटा सेटचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी सुचविलेल्या उपायांना महालनोबिस अंतर (महालनोबिस डिस्टन्स) म्हणून ओळखले जातात. ते नियोजन आयोगाचे (1956-1961) दरम्यान सदस्य होते आणि त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी दोन-क्षेत्रातील इनपुट-आउटपुट प्रारूप दिले जे नंतर नेहरू-महालनोबिस प्रारूप म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी डिसेंबर 1931 मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) ची स्थापना कोलकाता येथे केली. त्यांना पद्म विभूषण (1968), ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून वेल्डन मेमोरियल पुरस्कार (1944) रॉयल सोसायटी, लंडनचे फेलो (1945) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!