Marathi govt jobs   »   Job Notification   »   नागपूर महानगरपालिका भरती 2023

नागपूर महानगरपालिका भरती 2023, अग्निशमन विभागातील 350 पदांसाठी अर्ज करा

नागपूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर 

नागपूर महानगरपालिका भरती 2023: नागपूर महानगरपालिकेने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अग्निशमन व आणीबाणी विभागातील गट क संवर्गातील 350 रिक्त पदे भरण्यासाठी नागपूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 06 डिसेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण नागपूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

नागपूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

नागपूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 350 पदांची भरती होणार आहे. नागपूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव नागपूर महानगरपालिका
भरतीचे नाव नागपूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव गट क मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 350
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.nmcnagpur.gov.in

नागपूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

नागपूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 350 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात नागपूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 07
2  उप अग्निशमन अधिकारी 13
3 चालक यंत्रचालक 28
4 फिटर कम ड्रायव्हर 05
5 अग्निशामक विमोचक 297
एकूण  350

नागपूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

नागपूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

नागपूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
नागपूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 05 डिसेंबर 2023
नागपूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 06 डिसेंबर 2023
नागपूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2023

नागपूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 

नागपूर महानगरपालिका भरती 2023 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता
    • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
    • राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा स्टेशन ऑफिसर ॲण्ड इन्स्ट्रक्टर पाठयक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील पदविका) उत्तीर्ण असावा, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठयक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दि इन्स्टीटयूट ऑफ फायर इंजिनिअर्स (यु.के.) किंवा (इंडिया) या संस्थेकडून ग्रेड-आय पदवी प्राप्त केलेली असावी.
    • मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहिणे, वाचणे व बोलणे)
    • एम.एस.सी.आय. टी परिक्षा उत्तीर्ण असावा.
  • किमान शारीरिक पात्रता:
    • उंची – 165 से. मी. (महिला उमेदवारांसाठी उंची 162 से.मी.)
    • छाती – साधारण 81 से.मी. फुगवून 5 से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
    •  वजन – किमान 50 कि. ग्रॅ.
    •  दृष्टी – चांगली
  • अनुभव :
    • “अ” वर्ग महानगरपालिका/ महानगरपालिका/ विशेष नियोजन प्राधिकरण / शासकीय/ निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये उप-अग्निशमन अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान 3 वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी. किंवा “बाव’क’ वर्ग महानगरपालिकामध्ये उप-अग्निशमन अधिकारी या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान 5 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा-
    •  सरळसेवेच्या उमेदवाराचे वय 42 (40+2) वर्षापेक्षा जास्त असू नये.
    • शासकीय/निमशासकीय अग्निशमन संवेमध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी वयाची अट लागू राहणार नाही.
2  उप अग्निशमन अधिकारी
  •  शैक्षणिक पात्रता
    • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
    • राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा उप अग्निशमन अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दि इन्स्टीटयूट ऑफ फायर इंजिनीअर्स (यु.के) किंवा (इंडीया) या संस्थेकडून ग्रेड-आय पदवी प्राप्त केलेली असावी.
    •  मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
    • एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.
  •  किमान शारीरिक पात्रता:
    •  उंची 165 से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची 162 से.मी.)
    • छाती – साधारण 81 से.मी. फुगवून 5 से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
    • वजन – किमान 50 कि. ग्रॅ.
    • दृष्टी चांगली
  •  अनुभव :
    • ‘ब’ व ‘क’ वर्ग महानगरपालिकामध्ये प्रमुख अग्निशमक – विमोचक या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी किंवा ‘ड’ वर्ग महानगरपालिकामध्ये प्रमुख अग्निशामक-विमोचक या पदावर किंवा समकक्ष पदावर किमान 7 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी.
  •  वयोमर्यादा:-
    •  सरळसेवेच्या उमेदवाराचे वय 37 (35+2) वर्षापेक्षा जास्त असू नये.
    •  शासकीय / निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी वयाची अट 47 (45+2) वर्षापर्यंत शिथिल राहील.
3 चालक यंत्रचालक
  • शैक्षणिक पात्रता
    • माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक
    • जड वाहनचालक म्हणून 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक
    • वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
    • मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
    • राज्य अगिनशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अगिनशमक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य
  • किमान शारीरिक पात्रता:
    •  उंची 165 से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची 162 से.मी.)
    • छाती – साधारण 81 से.मी. फुगवून 5 से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
    • वजन – किमान 50 कि. ग्रॅ.
    • दृष्टी चांगली
  • पाठ्यक्रम :
    • उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षन केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राचा ३ महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.
  •  वयोमर्यादा:-
    • उमेदवाराचे वय 32 (30+2) वर्षापेक्षा जास्त असू नये.
4 फिटर कम ड्रायव्हर
  • शैक्षणिक पात्रता
    • माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा
    • आय.टी. आय मधील मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक /समकक्ष कोर्स उत्तीर्ण असावा.
    • जड वाहन चालविण्याचा कमीतकमी 3 वर्षांचा अनुभव असावा
    • वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
    • मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
    • एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.
  •  वयोमर्यादा :-
    • आराखीव प्रवर्गाकरीता वयोमर्यादा किमान 18 वर्ष कमाल 35 (33+2) वर्ष. आरक्षीत प्रवर्गसाठी किमान 18 वर्ष व कमाल 40 (38+2) वर्षे.
5 अग्निशामक विमोचक
  •  शैक्षणिक अर्हता
    • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असने आवश्यक.
    • राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा पाठयक्रम उत्तीर्ण असावा

किंवा

    • महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचे कडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहीणे, वाचणे व बोलणे)
    • एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा.
  • किमान शारीरिक पात्रता:
    •  उंची 165 से. मी. (महिला अमेदवारांसाठी उंची 162 से.मी.)
    • छाती – साधारण 81 से.मी. फुगवून 5 से. मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
    • वजन – किमान 50 कि. ग्रॅ.
    • दृष्टी चांगली
  • वयोमर्यादा :-
  • उमेदवाराचे वय 32 (30+2) वर्षापेक्षा जास्त असू नये.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना 

नागपूर महानगरपालिकेने गट क मधील विविध संवर्गातील एकूण 350 रिक्त पदे भरण्यासाठी नागपूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नागपूर महानगरपालिका भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना

नागपूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

नागपूर महानगरपालिकेने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अग्निशमन व आणीबाणी विभागातील गट क संवर्गातील 350 रिक्त पदे भरण्यासाठी नागपूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

नागपूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क

नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

नागपूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

नागपूर महानगरपालिका भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

  • लेखी परीक्षा (100 गुण), शारीरिक पात्रता व शारीरिक चाचणी (70 गुण) यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण 170 गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
  • तथापि, चालक यंत्र चालक या पदाकरीता लेखी परिक्षा नसुन वरील सर्व शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता चाचणीसह प्रत्यक्ष जड वाहन चालविणेबाबत चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्यास एकूण 30 गुण राहतील, असे एकूण 100 (70+30) गुणांपैकी प्राप्त एकूण गुणानुसार चालक यंत्र चालक या पदाकरीता गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. (लेखी परिक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण राहील)
  • नागपूर महानगरपालिकेचे संवर्गनिहाय खालीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येईल. प्रत्येक परीक्षेसाठी परिक्षेचा एकूण कालावधी दोन तास राहील.
पदनाम विषय प्रश्न  गुण दर्जा  माध्यम वेळ
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी मराठी 15 15 बारावी मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40 तांत्रिक विषय संबंधित
 उप अग्निशमन अधिकारी मराठी 15 15 बारावी मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40 तांत्रिक विषय संबंधित
फिटर कम ड्रायव्हर मराठी 15 15 दहावी मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40 तांत्रिक विषय संबंधित
अग्निशामक विमोचक मराठी 15 15 दहावी मराठी 2 तास
इंग्रजी 15 15 इंग्रजी
बौद्धिक चाचणी 15 15 मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 15 15
तांत्रिक 40 40 तांत्रिक विषय संबंधित

नागपूर महानगरपालिका भरती 2023: वेतनश्रेणी 

नागपूर महानगरपालिका भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी S-14 :38600-122800
 उप अग्निशमन अधिकारी S-13:35,400-1,12,400
चालक यंत्रचालक S-8 :25500-81100
फिटर कम ड्रायव्हर S-8 :25500-81100
अग्निशामक विमोचक S-6 :19900-63200

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नागपूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

नागपूर महानगरपालिका भरती 2023 05 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

नागपूर महानगरपालिका भरती 2023 350 पदांसाठी जाहीर झाली.

नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख काय आहे?

नागपूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.