Marathi govt jobs   »   MPSC Syllabus – एमपीएससी अभ्यासक्रम 2020

MPSC Syllabus – एमपीएससी अभ्यासक्रम 2020

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोकरीच्या इच्छुकांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्य सेवा परीक्षा (एमपीएससी राज्यसेवा परीक्षा म्हणूनही ओळखली जाते) ही एक उत्कृष्ट परीक्षा आहे. महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत राज्य प्रशासनात  विविध विभागात अधिकारी भरती करण्यासाठी एमपीएससीमार्फत दरवर्षी ह्या परीक्षेचे आयोजन केले जाते. हि परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतली जाते.

इतर सर्व राज्य लोक सेवा आयोग आणि यूपीएससी प्रमाणे, एमपीएससी राज्य सेवा परीक्षा देखील तीन फेरीमध्ये घेतली जातेः

  1. पूर्व परीक्षा
  2. मुख्य परीक्षा
  3. मुलाखत

पुढील फेरीस पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक फेरीत पास होणे आवश्यक आहे, जर उमेदवाराने पूर्व परीक्षा क्लिअर केली, तर तो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरेल. मुख्य परीक्षा क्लिअर झल्यावर्ती मग उमदेवराला अंतिम फेरीत म्हणजेच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. या लेखामद्धे पूर्व परेक्षेचे अभ्यासक्रमारची माहिती दिली आहे.

एमपीएससी अभ्यासक्रम: पुर्व परिक्षा

यूपीएससी प्रमाणे, एमपीएससी देखील अभ्यासक्रमातील फक्त विषयांची नावे प्रदान करते. हि राज्यस्तरीय परीक्षा असल्याने बहुतेक प्रश्न हे महाराष्ट्रवरतीच येतात. योग्य तयारी करून उमेदवार दोन्ही परीक्षांसाठी तयारी करू शकतो. राज्यसेवा पूर्व परीक्षे मध्ये २ पेपर असतात . प्रथम पेपर हा २०० गुणांचा असून त्यामध्ये १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) असतात. राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठी आणि इंग्लिश मध्ये देऊ शकता.

 

पेपर l अभ्यासक्रम (गुण २००, १०० प्रश्न, कालावधी 2 तास)

  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालूघडामोडी.
  2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ.
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
  4. महाराष्ट्र व भारत – राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्थ, पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरणं, हक्कविषयक घडामोडी इ.
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास, गरीबी, समावेश, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.
  6. पर्यावरणशास्त्र, जैवविविधता आणि हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे.
  1. सामान्य विज्ञान.

 

पेपर ll अभ्यासक्रम (गुण २००, १०० प्रश्न, कालावधी २ तास)

  1. आकलन क्षमता.
  2. संवाद कौशल्य आणि वैयक्तिक कौशल्ये.
  3. तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  4. निर्णय घेणे आणि समस्या सोडवन्याची क्षमता.
  5. बौद्धिक क्षमता.
  6. मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, इ.), (दहावी पातळी), (चार्ट, आलेख, सारण्या, डेटाची पूर्तता इ. – दहावी पातळी)
  7. मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी पातळी) यासंदर्भातील प्रश्नांची चाचणी प्रश्नपत्रिकेत भाषांतर न करता मराठी व इंग्रजी भाषेतील परिच्छेदांद्वारे केली जाईल.

Sharing is caring!