Table of Contents
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर केला आहे. या लेखात आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात मेरीट लिस्ट यांचा समावेश आहे.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: विहंगावलोकन
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेचे नाव | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 |
लेखाचे नाव | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल प्रसिद्धीपत्रक
दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकतात.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल प्रसिद्धीपत्रक PDF
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल मेरीट लिस्ट
दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल मेरीट लिस्ट जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन मेरीट लिस्ट डाउनलोड करू शकतात.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल मेरीट लिस्ट PDF
पोस्ट प्रेफरंस निवडण्याकरिता उमेदवारांसाठी सूचना
पोस्ट प्रेफरंस निवडण्याकरिता उमेदवारांसाठी सूचना खाली दिलेल्या आहेत:
- वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 23 संवर्गाकरीता 1 ते 23 मधील पसंतीक्रम अथवा No Preference’ विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
- अधिसूचित सर्व संवर्गाकरिता/ पदांकरिता 1 ते 23 मधील पसंतीक्रम निवडणा-या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार होईल.
- अधिसूचित 23 संवर्गापैकी /पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता ‘No Preference’ हा विकल्प निवडावा
- संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर ‘Download PDF’ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
- पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
- विहित कालावधीनंतर संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.