Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण घटना समिती बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Indian Constitution (भारतीय संविधान) |
टॉपिक | घटना समिती |
घटना निर्मिती: पार्श्वभूमी
- तत्कालीन घटना सभेत एकूण 389 सदस्य होते त्यापैकी 296 सदस्य हे ब्रिटीश भारतासाठी तर 93 संस्थानिकांसाठी होते.
- घटना समितीमध्ये संस्थानिकांनी भाग घेण्याचे न ठरविल्यामुळे त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नाहीत.
- घटना समितीतील 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये देशभरात निवडणुका घेण्यात आल्या.
- त्या पैकी सर्वाधिक 208 जागी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर मुस्लीम लीगचे 73 व अपक्षांचे 15 उमेदवार निवडून आले.
- मुस्लीम लीगचे उमेदवार भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात निघून गेल्यामुळे घटना समितीची मुळची 389 ही संख्या कमी झाली.
- भारतीय स्वातंत्र्याचा कायदा दिनांक 18 जुलै 1947 रोजी संमत झाल्यानंतर या कायद्यानुसार घटना समितीची संख्या 299 इतकी ठरविण्यात आली.
- त्यापैकी 229 सदस्य हे प्रांताचे तर 70 सदस्य हे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते.
घटना समितीचे अध्यक्ष व सदस्य
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. घटना समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलील्या तक्त्यात दिली आहे.
घटना समितीचे अध्यक्ष व सदस्य | |
पद | व्यक्तीचे नाव |
घटना समितीचे अध्यक्ष | डॉ. राजेंद्र प्रसाद |
घटना समितीचे उपाध्यक्ष | हरेंद्र कुमार(एच. सी.) मुखर्जी |
घटना समितीचे सल्लागार | बी. एन. राव |
घटना समितीचे प्रमुख पुरुष सदस्य | पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, श्यामा प्रसाद मुखर्जी, सी. राजगोपालाचारी |
घटना समितीचे प्रमुख स्त्री सदस्या | सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामिनाथन, कमला चौधरी, हंसाबेन मेहता, विजयालक्ष्मी पंडित, एनी मास्केरेन, मालती चौधरी |
घटना निर्मिती: कालानुक्रम
भारतीय घटनेच्या निर्मिती साठी घटना समितीचे कामकाज एकूण 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवस म्हणजेच 1082 दिवस चालले. भारतीय घटनेच्या निर्मितीचा कालानुक्रम खाली सविस्तरपणे दिलेला आहे.
- 6 डिसेंबर 1946: कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नुसार संविधान सभेची स्थापना
- 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946: घटना समितीचे पहिले अधिवेशन या काळात झाले. हे अधिवेशन दिल्ली येथे झाले. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष होते. मुस्लीम लीगने बॅरिस्टर जीनांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनावर बहिष्कार टाकला.
- 11 डिसेंबर 1946: घटना समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.राजेंद्र प्रसाद तर उपाध्यक्ष पदी हरेंद्रकुमार मुखर्जी यांची निवड करण्यात आली व घटनात्मक कायदेशीर सल्लागार पदी बी.एन. राव यांना नियुक्त केले.
- 13 डिसेंबर 1946: घटना समितीचे वरिष्ठ सदस्य व संघराज्य घटना व अधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरूंनी ‘राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव’ सादर केला. याच ठरावावर भारतीय राज्य घटनेचा ‘सरनामा’ आधारित आहे.
- 22 जानेवारी 1947: पं. जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला.
- 22 जुलै 1947: पिंगाली वेंकय्या यांनी तयार केलेला नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला.
- 15 ऑगस्ट 1947: स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारत भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व असे विभागले गेले.
- 29 ऑगस्ट 1947: घटना समितीची सर्वात महत्वाची उपसमिती मसुदा समितीच्या अध्यक्ष पदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात मसुदा समितीचे कामकाज चालले.
- 26 नोव्हेंबर 1949: घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला व घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यावर सही केली. 299 पैकी 284 सदस्यांनी संविधानाच्या मसुद्यावर सह्या केल्या.
- 24 जानेवारी 1950: घटना समितीची विशेष व शेवटची बैठक संपन्न
- 26 जानेवारी 1950: भारतीय राज्य घटना अंमलात आली.
घटना समितीच्या काही प्रमुख उपसमित्या व त्यांचे अध्यक्ष
समिती | अध्यक्ष |
संघराज्य घटना समिती | पं. जवाहरलाल नेहरू |
प्रांतिय राज्यघटना समिती | सरदार वल्लभभाई पटेल |
अर्थ व स्टाफ समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
अधिकारपत्र समिती | सर अलादी कृष्णस्वामी अय्यर |
गृह समिती | डॉ. बी. पट्टाभिसीतारामय्या |
सुकाणू समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
मसुदा समिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
संघराज्य अधिकार समिती | पं. जवाहरलाल नेहरू |
राष्ट्रध्वजासंबंधी समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
मसुदा राज्यघटना चिकित्सा समिती | सर अलादी कृष्णस्वामी अय्यर |
राज्यघटना समितीचे कार्य | ग. वा. मावळणकर |
भाषिक प्रांतांवरील समिती | के. एम. मुन्शी |
मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती | सरदार वल्लभभाई पटेल |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.