महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आाली आहे.
MPSC Exam 2021 Postponed: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही कळवलं आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पुढे ढकलण्यात आली
तरी सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात घेऊन तुमचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकारकरण्यासाठी परीक्षा देण्यासाठी अजून थोडे दिवस भेटले आहेत असे समजून या संधीचा चांगला लाभ घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास पुनरावलोकन व सराव करा.
परीक्षेसाठी शुभेच्छा.