Table of Contents
MPSC परीक्षा 2024 अपडेट
MPSC परीक्षा 2024 अपडेट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 21 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून विविध संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. या लेखात MPSC परीक्षा 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मिळवा.
MPSC परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन
MPSC परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
पदाचे नाव | गट अ व ब मधील विविध पदे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
लेखाचे नाव | MPSC परीक्षा 2024 अपडेट |
MPSC परीक्षा 2024 अपडेट प्रसिद्धीपत्रक PDF
आयोगातर्फे आयोजित दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच दिनांक 19 मे, 2024 रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम, 2024 मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल.
MPSC परीक्षा 2024 अपडेट प्रसिद्धीपत्रक PDF
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.