Marathi govt jobs   »   Result   »   MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा...

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर, निवड व गुणवत्ता यादी डाउनलोड करा

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 18 मार्च 2024 रोजी MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली आहे. MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल : विहंगावलोकन

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
भरतीचे नाव महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022
परीक्षेचे नाव महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022
परीक्षा पद्धती ऑफलाईन
MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल 18 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 18 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.

परीक्षेचे नाव तात्पुरती निवड यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 येथे क्लिक करा येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना

  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2022 या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. 
  • प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो. 
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. 
  • सहायक अभियंता, स्थापत्य, गट-ब, श्रेणी-2 करीता दिव्यांग संवर्गातील कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता (Deaf/ Hard Hearing) या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील एका पदासाठी सदर वर्गवारीतील दिव्यांग उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे अराखीव संवर्गातील एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. यास्तव जाहीरातीतील नमूद 102 पदांऐवजी 101 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
  • प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक 19 मार्च 2024 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 25 मार्च 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल कधी जाहीर झाला?

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल 18 मार्च 2024 रोजी जाहीर झाला.

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती या लेखात मिळेल.