Table of Contents
सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती
राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकरभरती स्वत: मार्फत करण्यास महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सहमती दर्शविली आहे. आता शासन काय निर्णय घेते, याबाबत उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे सरकारने पारदर्शक नोकरभरतीसाठी अराजपत्रित अधिकारी (व) तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही एमपीएससीमार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने अस्वस्थता प्रक्रिया एमपीएससीकडे देण्याचे प्रस्तावित आहे. काही संघटनांनीही तशी मागणी केली होती. पदोन्नतीत आरक्षण रद्द करून सर्व पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचा निर्णय शासनाने गेल्या आठवड्यात घेतल्याने मागासवर्गीयामध्ये अस्वस्थता आहे.
सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड एमपीएससीमार्फत केली जाते. अराजपत्रित ब, क आणि ड यांची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जाते. ही भरती निवड मंडळांऐवजी एमपीएसीमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या संवर्गाची नोकर भरती एमपीएससीमार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते. दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त असतात. या मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलिकडेच तीन कंपन्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली होती. मात्र, आता विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारितील निवड प्रक्रिया एमपीएससीकडे देण्याचे प्रस्तावित आहे. काही संघटनांनीही तशी मागणी केली होती.
Source- lokmat