Table of Contents
MPSC All Pending Prelims Results will out soon
पूर्व परीक्षांचे प्रलंबित निकाल लवकरच निघणार: MPSC प्रलंबित पूर्व परीक्षांचे निकाल लवकरच निघणार असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित खालील पूर्व परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत:
अ. क्र. |
जाहिरात क्रमांक |
परीक्षेचे नाव |
1 | 02/2020 | सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 |
2 | 06/2020 | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 |
3 | 19/2019 | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 |
उपरोक्त परीक्षांचे निकाल तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सदर प्रक्रिया पूर्ण होताच नजीकच्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येतील असे आयोगाने या प्रसिद्धिपत्रात सांगितले आहे. तसेच पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्य परीक्षेचे दिनांक निश्चित करून तेही लवकरच जाहीर होतील असेही सांगितले आहे.
शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पद संख्या आणि आरक्षणाच्या आधारे आयोगाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येते. पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय पूर्णतः शासनाच्या अखत्यारीतील आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आयोगास विविध सामाजिक व समांतर आरक्षित पदावरील भरतीसाठी प्राप्त होणान्या पदांच्या मागणीपत्राच्या आधारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे विविध सामाजिक घटकासाठी आरक्षित जागा निश्चित करण्याची अथवा तपासण्याची बाब आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रसिद्धिपत्रात सांगितले आहे.
MPSC पूर्व परीक्षांचे प्रलंबित निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर जे विध्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना त्यांचा निकाल लवकरच पाहायला मिळणार आहे आणि लवकरच परीक्षेबाबत इतर Updates तुम्हाला Adda-247 मराठी च्या संकेतस्थळावर आणि App वर उपलब्ध होतील.
सर्वाना तुमच्या निकालासाठी Adda247-मराठी कडून खूप शुभेच्छा.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
