Marathi govt jobs   »   Study Materials   »   वर्गीकरण

वर्गीकरण : MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

वर्गीकरण

महाराष्ट्रातील आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 आणि इतर सर्व स्पर्धा या सर्वांची तयारी करतांना बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला फार महत्व आहे. बुद्धिमत्ता चाचणीत वर्गीकरण हा घटक फार महत्वाचा असून या घटकावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. वर्गीकरण या प्रकारच्या प्रश्नात चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडायचा असतो. या लेखात आपण वर्गीकरण(Classification) बद्दल माहिती पाहणार आहोत.

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वर्गीकरण: विहंगावलोकन

आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वर्गीकरण या घटकावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. या लेखात वर्गीकरण म्हणजे काय त्याचे प्रश्न कसे सोडवावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

वर्गीकरण: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
साठी उपयुक्त MPSC भरती परीक्षा 2024
विषय बुद्धिमत्ता चाचणी
लेखाचे नाव वर्गीकरण
महत्वाचे मुद्दे
  • वर्गीकरणाची संकल्पना
  • वर्गीकरणावरील उदाहरणे

वर्गीकरणाची संकल्पना

बुद्धिमत्ता चाचणीत वर्गीकरण हा एक महत्वाचा टॉपिक आहे. यात प्रामुख्याने चार पर्यायांपैकी एक पर्याय जो त्या गटात बसत नाही त्याला निवडावे लागते. समूहाच्या या भागामध्ये, एक व्यक्ती किंवा गोष्टी इतर शब्दांपेक्षा भिन्न आहेत, त्यांच्याकडे काही सामान्य गुणधर्म आहेत. वर्गीकरणात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील माहिती इतिहास, विज्ञान, वर्णमाला आणि संख्यात्मक प्रश्न यावर आधारित प्रश्न विचारल्या जातात. याचे प्रमुख तीन प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे आहेत

  • शब्द आणि लोकांमध्ये वर्गीकरण
  • अक्षरांमध्ये वर्गीकरण
  • संचामध्ये वर्गीकरण

या तीनही प्रकारचे प्रश्न खाली देण्यात आले आहे.

वर्गीकरणावरील उदाहरणे

प्रकार 1: या प्रकारात चार पर्याय दिलेले असतात त्यातील वेगळा पर्याय निवडावा लागतो.
Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) वकील
(b) आमदार
(c) महापौर
(d) राज्यपाल
उत्तर. (a)

स्पष्टीकरण: शेवटचे 3 पर्याय राजकारणाशी संबंधित आहेत आणि पहिला पर्याय अनुसरत नाही. म्हणून, वकील हा गटात बसत नाही.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) लघुकोन
(b) समांतर
(c) काटकोन
(d) विशालकोन

उत्तर. (b)

स्पष्टीकरण: लघुकोन, काटकोन आणि विशालकोन हे कोणाचे प्रकार आहेत. त्यामुळे समांतर हे वेगळे आहे.

Q3. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) कानपूर
(b) अलाहाबाद
(c) वाराणसी
(d) मथुरा

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: मथुरा वगळता सर्व गंगा नदीच्या काठावर वसलेले आहेत.

प्रकार 2: मागील प्रकारात, एकच शब्द किंवा गोष्ट दिली आहे जी समान प्रकारच्या गुणधर्मांचे अनुसरण करते. या प्रकारात आपल्याकडे एक जोडी आहे, पहिला घटक दुसऱ्याशी ज्या पद्दतीने संबंधित आहे त्याच पद्दतीने इतर सुद्धा संबंधित असतात फक्त एकाचा संबंध वेगळा असतो. त्याला निवडणे आवश्यक आहे.

Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) चित्रकार: गॅलरी
(b) अभिनेता: स्टेज
(c) कामगार: कारखाना
(d) विद्यार्थी: स्टेज

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, (d) वेगळा आहे. इतर सर्व जोड्यांमध्ये, दुसरा शब्द हे पहिल्या शब्दाचे कार्य करण्याचे ठिकाण आहे.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) ऑर्निथोलोजि : पक्षी
(b) मायकोलॉजी : बुरशी
(c) सायाटोलॉजी : शैवाल
(d) बायोलॉजी : वनस्पतिशास्त्र

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, उत्तर (d) आहे. इतर सर्व जोड्यांमध्ये त्या दुसरा शब्दाचा अभ्यास म्हणजे पहिला शब्द आहे.

Q3. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) 8 – 64
(b) 9 – 81
(c) 10 – 100
(d) 11 – 131

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: पहिल्या अंकाचा वर्ग दुसरा अंक आहे. त्यामुळे पर्याय d वेगळा आहे.

प्रकार 3: या प्रकारात, जोड्या किमान 3 अंकी किंवा वस्तू दिलेल्या आहेत ज्या कोणत्याही विशिष्ट गुणधर्मासह एकमेकांशी संबंधित आहेत.

Q1. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) (3, 9, 27)
(b) (5, 25, 125)
(c) (6, 36, 216)
(d) (9, 81, 728)

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: स्पष्टपणे, (d) वेगळा पर्याय आहे, इतर पर्यायात पहिली संख्या, पहिल्या संख्येचा वर्ग, पहिल्या संख्येचा घन असा क्रम चालू आहे.

Q2. गटात न बसणारा शब्द निवडा.
(a) 5, 10, 15, 20
(b) 6, 12, 18, 24
(c) 8, 60, 10, 40
(d) 15, 30, 45, 60

उत्तर. (d)

स्पष्टीकरण: पर्याय c अंक 8 च्या गुणोत्तरांचे अनुसरण करत नाही तर उर्वरित 1 : 2 : 3 : 4 गुणोत्तर आहे.

MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Topic  Link
वेन आकृत्या Link
सरासरी Link
गहाळ पद शोधणे Link
भागीदारी
Link
असमानता Link
चक्रवाढ व्याज Link
आकृत्या मोजणे Link
गुणोत्तर व प्रमाण Link
सह संबंध Link
घातांक Link
बैठक व्यवस्था
Link
वेळ व अंतर
Link

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वर्गीकरण हा घटक कोणत्या विषयात येतो?

वर्गीकरण हा घटक बुद्धिमत्ता चाचणी या विषयात येतो.

वर्गीकरण म्हणजे काय?

वर्गीकरण या घटकातील प्रश्नात चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडायचा असतो.