Marathi govt jobs   »   Ministry of Education launches NIPUN Bharat...

Ministry of Education launches NIPUN Bharat Programme I केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘निपुण भारत’ कार्यक्रम सुरु करण्यात आला.

Ministry of Education launches NIPUN Bharat Programme I केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'निपुण भारत' कार्यक्रम सुरु करण्यात आला._2.1

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘निपुण भारत’ कार्यक्रम सुरु करण्यात आला

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरीपर्यंत भारतातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान (एफएलएन) अवगत व्हावे या उद्देशाने “निपुण भारत” हा उपक्रम सुरु केला आहे. निपुण म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफीशिअंन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी (आकलानासाहित वाचनकौशल्य आणि अंकज्ञान विकासाकारिता राष्ट्रीय उपक्रम). समग्र शिक्षा अभियानाचा भाग असलेला हा उपक्रम शालेय पायाभूत वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे आणि त्यांना शाळेत राखणे, शिक्षक क्षमता वृद्धी, उच्च दर्जाचे आणि वैविध्यपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपयुक्त संसाधने आणि शिक्षण सामग्रीचा विकास आणि प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तपासणे या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे. शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांमधील सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटीने निष्ठा (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कुल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट अर्थात शाळा मुख्याधापक आणि शिक्षकांच्या परिपूर्ण विकासाकरिता राष्ट्रीय उपक्रम)  नावाचा एक नाविन्यपूर्ण आणि एकात्मिक कार्यक्रम सुरु केला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!