Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-16th July

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-16th July_2.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

 

Q1. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?
(a) कावेरी
(b) गोदावरी
(c) नर्मदा
(d) कोणतीही नाही

Q2. मुंबई हायमध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63% खनिज तेल तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी. ला येथे सर्वप्रथम 1974 मधे तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे?
a) इओसीन
b) मायोसीन
c) प्लायोसीन
d) प्लीस्टोसीन

 

Q3. खाली नहाराष्ट्रातील महत्वाची शिखरांची यादी दिली आहे. खालीलपैकी कोणता चढता क्रम (कमी उंची कडून जास्त उंची) बरोबर आहे?
(a) साल्हेर, सप्तशृंगी, त्रंबकेश्वर, कळसूबाई
(b) त्रंबकेश्वर, क्षप्तश्रृंगी, साल्हेर, कळसूबाई
(c) कळसूबाई, क्षप्तश्रुंगी, साल्हेर, त्रंबकेश्वर
(d) सप्तश्रृंगी, साल्हेर, कळसूबाई, त्रंबकेश्वर

 

Q4. महाराष्ट्राची किनारपट्टी ——–म्हणून ओळखली जाते.
(a) कारवार किनारा
(b) मलबार किनारा
(c) कोकण किनारा
(d) उत्कल किनारा

 

Q5. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयांच्या मुख्य भागाचा समावेश आवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो?
(1) अहमदनगर, सोलापूर, सांगली.
(2) अहमदनगर, भंडारा, गडचिरोली
(3) सोलापूर, कोल्हापूर, सांगली
(4) अमरावती, बीड, अकोला
(a) (1) व (2)
(b) (2) व (3)
(c) फक्त (1)
(d) फक्त (4)

Q6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयात सर्वात कमी तालुके आहेत?
(a) सिंधुदर्ग
(b) रायगड
(c) धुळे
(d) नंदूरबार

 

Q7. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(1) महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्हयात असून सर्वात कमी घनता कोकण विभागात व नागपूर विभागात आहे.
(2) महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15% असून विदर्भातील बहुतेक जिल्हयात तलावाच्या साहाय्याने 60 टक्के पाणी पुरवठा केला जातो.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1)
(b) फक्त (2)
(c) (1) आणि (2)
(d) वरीलपैकी कोणतही नाही

 

Q8. महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे?
(1) कोकणात प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो.
(2) कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो.
(3) कोकणात आवर्त व अभिसरण पाऊस पडतो.
(4) कोकणात आवर्त पाऊस पडतो.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त (1) बरोबर
(b) फक्त (2) बरोबर
(c) फक्त (3) आणि (4) बरोबर
(d) फक्त (1) आणि (4) बरोबर

 

Q9. महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नेक्रत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात —या महिन्यांत जास्त येतात.
(a) एप्रिल आणि जुलै
(b) एप्रिल आणि मे
(c) मे आणि जून
(d) जून आणि जुलै

Q10. खाली नमूद शहरांची मे महिन्यातील तापमान कक्षा ऊतरत्या क्रमाने लावा :
(1) नागपूर
(2) सोलापूर
(3) रत्नागिरी
(4) मुंबई उत्तरे
(a) (1), (2), (4), (3)
(b) (4), (3), (2), (1)
(c) (3), (1), (4), (2)
(4) (3), (4), (1), (2)

.

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

SOLUTIONS
S1. Ans.(d)
Sol. महाराष्ट्रातून बारमाही कोणतीही नदी वाहत नाही. दख्खनच्या पठारावर असणाऱ्या नद्यांना फक्त नैऋत्य मोसमी पावसापासून पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या नद्या पावसात जास्त पाण्यासह वाहतात.
नंतर या कमी पाण्याने वाहतात. या नद्या लांबीने लहान आहेत.
नर्मदा नदी – नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे. ही नदी पश्चिमेकडे वाहत. लांबी 1312 किमी.
ही नदी खचदरीतून वाहते.
या नदीने भेडाघाट धबधबा निर्माण केला आहे.
मध्यप्रदेश, महार गुजरात येथून वाहते. शेवटी खंबातच्या आखातास मिळते.
गोदावरी नदी – गंगेनंतर सर्वात मोठी नदी. द्विपकल्पीय भागातील सर्वात मोठी नदी. दक्षिण गंगा असेही म्हणतात.
नदीची लांबी – 1, 465किमी
नाशिक (महाराष्ट्र) मधील त्र्यंबकेश्वर येथे उगम. नदीचे खोरे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात आहे.

S2. Ans.(b)
Sol. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची निर्मिती अनेक वृक्ष व प्राणी हे जमिनीखाली गाडल्यानंतर त्यावर दाब पडतो व त्यातून कोट्यावधी वर्षानंतर निर्मिती होते.
मुंबई येथील खनिजतेल आणि नैसर्गिक वायू हा मायोसीन काळातील आहे.
भारतातील नैसर्गिक वायूंची प्रक्रिया, परिवहन आणि वितरण करणारी “गेल” ही सर्वात मोठी कंपनी आहे.
खनिज तेल सापडणारी ठिकाणे – मुंबई हाय, वसई (महाराष्ट्र), हाजीरा, कलोल, अंकलेश्वर (गुजरात), ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील क्षेत्र दिग्बोई, नहारकटिया (आसाम), कृष्णा-गोदावरी खोरे, कावेरी खोरे.
नैसर्गिक वायू – मुंबई हाय, त्रिपुरा, कनोज, तापी खोरे, कृष्णा-गोदावरी खोरे.

S3. Ans.(b)
Sol. महाराष्ट्रातील उंच शिखरे :
भारतामधील हिमालय पर्वतरांगेनंतर पश्चिम घाटामध्ये उंच शिखरे जास्त आहेत
महाराष्ट्रात पश्चिम घाटास सह्याद्री घाट असे संबोधले जाते. सह्याद्री व सह्याद्रीच्या उपरांगा यांमध्ये उंच शिखरे आहेत.
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे (उंचीनुसार)
कळसूबाई – 1646 मी. अहमदनगर
साल्हेर – 1567 मी नाशिक
महाबळेश्वर -1438 मी सातारा
हरिश्चंद्रगड – 1424 मी अहमदनगर
सप्तशृंगी – 1416 मी नाशिक
तोरणा- 1404 मी पुणे
राजगड – 1376 मी पुणे
अस्तंभा – 1325 मी नंदूरबार
त्र्यंबकेश्वर – 1304 मी नाशिक

S4. Ans.(c)
Sol. भारतास एकूण 7517 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
एकूण नऊ राज्यास समुद्रकिनारा लाभला आहे. सर्वाधिक सागरी सीमा लागलेली राज्य
1. गुजरात राज्य – 1700 किमी
2. आंध्रप्रदेश – 1011 किमी
3. तमिळनाडू – 907 किमी
4. महाराष्ट्र – 720 किमी
इतर राज्यातील समुद्रकिनाऱ्याची नावे:
महाराष्ट्र – कोकण
कर्नाटक – कारवार
केरळ – मलबार
तमिळनाडू – कोरोमंडल
ओडिसा – उत्कल

S5. Ans.(c)
Sol. कृषी हवामान विभाग (महाराष्ट्र)
महाराष्ट्राचे वार्षिक पर्जन्य, मृदा प्रकार, पीक पद्धत यानुसार नऊ हवामान विभाग केले आहे.
South konkan – Vengurla
North konkan – karkam
western ghat zone – Igatpuri
sub montane zone – kolhapur

western Maharashtra plain zone – pune
Westerm Maharashtra scarcity zone – solapur
Central maharashtra plateau zone – Aurangabad
Central Vidarbha zone – Yavatmal
Eastern vidarbha zone – sindewadi

S6. Ans.(c)
Sol. सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे
मुंबई शहर – 0
मुंबई उपनगर – 3
धुळे – 4
हिंगोली – 5
नंदुरबार, वाशिम – 6
ठाणे, अकोला, भंडारा – 7

S7. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रातील जलसिंचन :
विहीर हे महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्ह्यात आहे. तसेच नगर जिल्हयात सर्वात जास्त विहीरी आहेत.
सर्वात कमी घनता कोकण व नागपूर विभागांत आहे.
विहीरीखालोखाल कालव्यांद्रारे सुमारे 23 टक्के क्षेत्र अंमलात आणले जाते. मुख्यत्त्वेकरून पठारावर कृष्णा,
गोदावरी, भीमा व त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे योजना अमलात आणली जाते.
तलाव सिंचनपूर्व विदर्भातभंडारा, , चद्रपूर, गडचिरोली इ. भागात तलाव जलसिंचन मोठ्या प्रमाणात केले जाते.

S8. Ans.(b)
Sol. कोकण : यामध्ये सह्याद्रीच्या पश्चिमेकडील चिंचोळ्या 720 किमी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो.
महाराष्ट्रात हा भाग कोकण म्हणून प्रसिद्ध आहे.
कोकणातील पावसाची वैशिष्ट्ये :
1. कोकणात मान्सून प्रकारचा पाऊस पडतो.मान्सूनचे आगमन प्रथम कोकणात होते.
2. नैक्रत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे आडून – प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
3. हा पाऊस मुख्यतः जून ते ऑक्टोबर यामध्ये पडतो.
4. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस घाटमाध्यावर पडतो, त्यानंतर कोकणात पडतो.

S9. Ans.(c)

Sol. एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो.
काही वेळेस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहतातत.
महाराष्ट्रात एप्रिल-मे महिन्यात जो पाऊस पडतो, त्याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या काळात 8 ते 13 सेमी पाऊस पडतो.
एप्रिल व मे महिन्यात आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसास आंबेसरी म्हणतात.

S10. Ans.(a)
Sol. महाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील तापमान कक्षा :
21 मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो व दिनमानाचा कालावधी वाढत जातो.
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे 16° उत्तर अ. ते 22°उत्तर अ. दरम्यान असल्याने या काळात तापमान वाढत जाते.
या काळात (एप्रिल-मे) महाराष्ट्रातील तापमान सरासरी 34 ते 35 अंश से पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असते.
महाराष्ट्रातील मे महिन्यातील सरासरी तापमान -40°से असते.
उन्हाळ्यात सर्वात ज़ास्त तापमान (विभाग) :
1. विदर्भ
2. मराठवाडा
3. कोकण

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!