Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-10th July

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-10th July_2.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

Q1. पुढील विधानांचा विचार करा
1. केवळ नर हत्तींना सुळे असतात
2. केवळ नर हरणांना शिंगे असतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(a) 1 बराबर तर 2 चूक
(b) 2 बरोबर तर 1 चूक
(c) दोन्ही बरोबर
(d) दोन्ही चूक

Q2. कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे?
‘सुमारे 30 वर्षे जगतो, सारनाथशी जोडलेला, आशियाई व आफ्रिकन असे दोन प्रकार’
(a) सिंह
(b) हत्ती
(c) वाघ
(d) घोडा

Q3. खालील विधान आणि कारण वाचा:
विधान अ : महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात पंजीकृत वस्त्यांचा आकृतीबंध आढळतो.
कारण र : महाराष्ट्रातील लाव्हा निर्मित पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरवठ्याच्या चांगल्या सोयी व शेतीचा चांगला विकास आढळतो.
योग्य पर्याय निवडा :
(a) अ आणि र ही दोन्ही विधाने सत्य असून र हे अ चे सुयोग्य स्पष्टीकरण देते.
(b) अ आणि र ही दोन्ही विधाने सत्य असली तरी र हे अ चे सुयोग्य स्पष्टीकरण देत नाही.
(c) अ सत्य असून र असत्य आहे.
(d) अ हे असत्य असून र सत्य आहे.

Q4. खालील घटकांपैकी कोणते घटक खेड्याचा आकार ठरवतात?
1. प्रत्यक्ष लोकसंख्येचा आकार (size)
2. लोकांना आधारदेण्याची भूमी क्षमता
3. प्रदेशातील आर्थिक विकासाचा स्तर
4. जमिनीच्या प्राकृतिक (physical) मर्यादा
(a) 1, 2, 3 आणि 4
(b) 1 आणि 2
(c) 1, 2 आणि 3
(d) 1, 2 आणि 4

Q5. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात?
1. डोंगराळ प्रदेश
2. नद्यांच्या सुपीक खोऱ्यात.
3. कमी पावसाच्या प्रदेशात.
4. कोकणचा किनारा
(a) 1, 2, 3

(b) 2, 3, 4
(c) 1, 3, 4
(d) 1, 2, 4

Q6. वस्तीचे मुख्य भाग आहेत.
1. समरुप भाग
2. मध्य भाग
3. परिसंचरण भाग
4. विशिष्ट भाग
पर्यायी उत्तरे :
(a) 1 आणि 2
(b) 2, 3 आणि 4
(c) 1, 3 आणि 4
(d) वरिलपैकी सर्व

Q7. विखुरलेल्या वस्त्यांची खालीलपैकी कोणती वैशिष्टे बरोबर आहेत?
1. मर्यादित लोकवस्ती
2. सामाजिक सेवांची उपलब्धता
3. प्रदूषणमुक्त पर्यावरण
4. दैनंदिन प्रवासाची गरज नाही.
पर्यायी उत्तरे :
(a) (1) आणि (2) बरोबर
(b) (2) आणि (3) बरोबर
(c) (1), (3) आणि (4) बरोबर
(d) (2) आणि (4) बरोबर

Q8. 2001 च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रमलावा.
1. ग्रामीण ते ग्रामीण
2. ग्रामीण ते नागरी
3. नागरी ते नागरी
4. नागरी ते ग्रामीण
पर्यायी उत्तरे :
(a) (1), (2), (3), (4)
(b) (2), (3), (4), (1)
(c) (3), (4), (1), (2)
(d) (1), (2), (4), (3)

Q9. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
विधान (1) : ग्रामीण शहरी स्थानांतर हे भारतीय लोकसख्येचे वैशिष्ट्ये आहे.
विधान (2): ग्रामीण भागातून स्थानांतराचे मुख्यकारण रोजगार आहे.

(a) विधान (1) आणि (2) दोनही बरोबर आहेत आणि विधान (2) हे (1) चे योग्य स्पष्टीकरण/कारण आहे.
(b) विधान (1) आणि (2) दोन्ही बरोबर आहेत परंतु विधान (2) हे (1) चे योग्य स्पष्टीकरण /कारण नाही.
(c) विधान (1) बरोबर आहे व विधान (2) चूक आहे.
(d) विधान (1) चूक आहे व विधान (2) बरोबर आहे.

Q10. खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते?
(a) गडचिरोली, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर
(b) चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गडचिरोली
(c) औरंगाबाद, सोलापूर, ठाणे, नाशिक
(d) ठाणे, नाशिक, परभणी, धुळे

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

 

SOLUTIONS

S1. Ans.(c)

Sol. हत्ती:

हत्तीचे जीवनमान 80 ते 90 वर्षे असते.

हत्तींमध्ये केवळ नरांमध्येच हस्तीदंत असतात.

हत्तीचे मोठे कान त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रण करतात.

हत्ती संवर्धनासाठी भारतात प्रोजेक्ट एलिफंट 1992 ला सुरू करण्यात आला.

हरिण :

फक्त नर हरणाला शिंगे असतात.

जीवनमान सरासरी 18 ते 20 वर्षे असते.

प्रोजेक्ट मस्क डीयर 1974 मध्ये केदारनाथ वन्यजीव अभयारण्य येथे सूरू करण्यात आला.

 

S2. Ans.(a)

Sol. सिंह :

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.

आशियाई किंवा अफ्रिकन असे दोन प्रकार.

सरासरी जीवनमान :- 25 ते 30 वर्षे.

गीर सिंह प्रकल्प (गुजरात):- 1972

1990 मध्ये संरक्षित प्राणी म्हणून घोषित.

वाघ

वाघ :- भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

सरासरी जीवनमान 15 ते 20 वर्षे.

जागतिक वाघ दिवस:- 29 जुलै

नागपूर शहर:- व्याघ्र राजधानी

घोडा :

सरासरी जीवनमान 25 ते 30 वर्षे.

 

S3. Ans.(a)

Sol. पठारी प्रदेशातील वस्त्यांचे प्रारूप :

पठारी प्रदेशात जमीन समतल असते.

वस्त्यांतील घरे एकमेकांना जोडून असल्यामुळे पंजीकृत आकृतीबंध असतो.

पंजीकृत वस्त्यांमध्ये सर्व घरे एका मध्यवर्ती ठिकाणाला केंद्रित असतात.

आढळ- पठारी व मैदानी भाग.

 

S4. Ans.(d)

Sol. खेड्याचा आकार ठरवणारे घटक :

  1. प्रत्यक्ष लोकसंख्येचा आकार
  2. जमिनीची प्राकृतिक मर्यादा
  3. शेतीचे प्रमाण
  4. पाणी व हवामान
  5. आरोग्य
  6. लोकांना उपलब्ध असलेली जमीन
  7. साधनसामुग्री

 

S5. Ans.(c)

Sol. विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये :

विखुरलेल्या वस्त्या डोंगराळ प्रदेश, कमी पावसासा प्रदेश, कोकण किणारा या ठिकाणी आढळतात.

लोकसंख्या मर्यादित असते.

शेतकरी शेतजमिनीवरच राहात असल्याने अंतरात्मक विलगता स्पष्टपणे पाहावयास मिळते.

वसाहती प्रदूषपणापासून मुक्त असतात.

दैनिक गरजांचया पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यावर अवलंबून असतात.

 

S6. Ans.(d)

Sol. वस्तीचे दोन भाग

  1. a) मुख्य भाग :- 1.समरूप भाग, 2.परिसंचरण भाग,

3.मध्य भाग, 4.विशेष भाग

  1. b) दुय्यम भाग :- 1.सुरक्षित स्थान साधनसंपत्ती स्थान 3. नदी किनारा 4. शैक्षणिक स्थान 5. सीमावर्ती स्थान 6. खिंड 7. तीर्थस्थाने 8. बंदरे 9. राजधानी स्थान

 

S7. Ans.(c)

Sol. विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये :

विखुरलेल्या वस्त्या डोंगराळ प्रदेश, कमी पावसासा प्रदेश, कोकण किणारा या ठिकाणी आढळतात.

लोकसंख्या मर्यादित असते.

शेतकरी शेतजमिनीवरच राहात असल्याने अंतरात्मक विलगता स्पष्टपणे पाहावयास मिळते.

वसाहती प्रदूषपणापासून मुक्त असतात.

दैनिक गरजांचया पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यावर अवलंबून असतात.

 

S8. Ans.(a)

Sol. 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रम पुढीलप्रमाणे :

  1. ग्रामीण ते ग्रामीण.
  2. ग्रामीण ते नागरी
  3. नागरी ते नागरी
  4. नागरी ते ग्रामीण

2011 जनगणनेनुसार देखील प्रमाणानुसार वरीलप्रमाणेच उतरता क्रम लागतो.

 

S9. Ans.(d)

Sol. ग्रामीण भागातून स्थलांतर होण्याचे मुख्य कारण रोजगार आहे. इतर कारणे:-

  1. सामाजिक कारणे : विवाह, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधा, सामाजिक रूढी-परंपरा
  2. आर्थिक कारणे – व्यवसाय: वाहतुकीच्या सोयी-सुविधा, कृषीची खालावलेली स्थिती, औद्योगिकरण
  3. पर्यावरण व नैसर्गिक कारणे : चांगल्या दर्जाचे हवामान मिळविण्यासाठी, नैसर्गिक आपत्ती – महापूर, वादळे, दुष्काळ 4. नागरी सुविधांचे आकर्षण, उच्च दर्जाचे राहणीमान, राजकीय व धार्मिक छळ

 

S10. Ans.(b)

Sol. स्थलांतरित शेती मोठ्या प्रमाणात भारतातील विविध राज्यामध्ये केली जाते. राज्य – मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मिझोराम, मध्यप्रदेश, त्रिपुरा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, केरळ.

जेथे स्थलांरित शेती करायची असते तेथील झाडे तोडली जातात व जाळली जातात.

यामुळे जमिनीतील पोटॅशचे प्रमाण वाढले जाते. परंतु, सेंद्रीय पदार्थ नाश पावतात. अशा शेतीमध्ये नैसर्गिक खते वापरली जातात.

कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर केला जात नाही.

मुख्य पीक – तेलबिया, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, रागी ऑईल,

प्रामुख्याने ही शेती महाराष्ट्रातील आदिवासी भागामध्ये करण्यात येते. (ठाणे, पालघर, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली)

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!