Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024

महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024, पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी परीक्षेचे स्वरूप तपासा

महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024

महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024:  महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची तयारी करताना आधी परीक्षेचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही परीक्षेसाठी योग्य तयारी करू शकता. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे स्वरूप 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)

पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी परीक्षेचे स्वरूप 

उमेदवार खाली पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात.

शारीरिक चाचणीः

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल:

पुरुष उमेदवार गुण महिला उमेदवार गुण
1600 मीटर धावणे 20 800 मीटर धावणे 20
100 मीटर धावणे 15 100 मीटर धावणे 15
गोळाफेक 15 गोळाफेक 15
एकूण 50 एकूण 50

 

पुरुष/ तृतीयपंथी उमेदवार गुण महिला तृतीयपंथी उमेदवार गुण
1600 मीटर धावणे 20 800 मीटर धावणे 20
100 मीटर धावणे 15 100 मीटर धावणे 15
गोळाफेक 15 गोळाफेक 15
एकूण 50 एकूण 50

लेखी चाचणीः

(i) शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.

(ii) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

(iii) लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल.

(iv) संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरीता एकाच दिवशी लेखी परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेवूनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा.

(v) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेलः-

a) अंकगणित,

b) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;

c) बुध्दीमत्ता चाचणी,

d) मराठी व्याकरण

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती जयहिंद बॅच
पोलीस भरती जयहिंद बॅच

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.