Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षेचे स्वरूप 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षेचे स्वरूप 2024, पदानुसार परीक्षेचे स्वरूप तपासा

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षेचे स्वरूप 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवठची तारीख  21 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र कारागृह विभाग 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि महाराष्ट्र कारागृह विभाग भरती  संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024

25 जानेवारी 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षा 19 ते 21 मार्च 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग परीक्षेचे स्वरूप 2024

अ.क्र. पदाचे नाव मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण कालावधी
प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण 120 मिन
1. लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200
2. वरिष्ठ लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200
अ.क्र. पदाचे नाव मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण कालावधी
प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण प्रश्न  गुण 80 मिन
1. लघुलेखक 15 30 15 30 15 30 15 30 60 120
2. तांत्रिक पदे 15 30 15 30 15 30 15 30 60 120
  • लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमुद क्र 4 ते 25 मधील सर्व पदांकरिता 80 गुणांची व्यवसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परिक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यवसायिक चाचणी देता येईल.
  • परिक्षा कालावधी :-
    • ऑनलाईन परिक्षा :- 1 तास 20 मिनिटे (80 मिनिटे)
    • व्यवसायिक चाचणी :- 40 मिनिटे
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 02 गुण ठेवण्यात येतील.
  • महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13- अ दि. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी हि कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) च्या दर्जाच्या समान राहील व परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकुण 200 गुणांची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल.
  • परीक्षा ही Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची कठिण्याता तपसाण्यात येऊन त्योच समानीकरण करण्याचे (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये किती रिक्त पदे आहेत?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 मध्ये 255 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 01 जानेवारी 2024 रोजी जाहिर झाली.