Table of Contents
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 |
पदांचे नाव | विविध संवर्गातील पदे |
एकूण रिक्त पदे | 255 |
अर्ज सुरूवात करण्याची तारीख | 01 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवठची तारीख | 21 जानेवारी 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaprisons.gov.in |
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र कारागृह विभाग 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि महाराष्ट्र कारागृह विभाग भरती संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना | 01 जानेवारी 2024 |
महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख | 01 जानेवारी 2024 |
महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2024 |
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना
दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसूचना
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक
उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज लिंक
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी असून खालील तक्त्यात दिलेली आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
लघुलेखक निम्न श्रेणी | स एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -40 प्रति शब्द मि. |
मिश्रक | एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य) |
शिक्षक | एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य) |
शिवणकाम निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. |
सुतारकाम निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
बेकरी निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असैलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक |
ताणाकार | एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
विणकाम निदेशक | शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य ) |
चर्मकला निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
यंत्र निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
निटिंग अँड विव्हिंग निदेशक | एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्य |
करवत्या | चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. |
लोहारकाम निदेशक | एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
कातारी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
गृह पर्यवेक्षक | एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य. |
पंजा व गालीचा निदेशक | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
ब्रेललिपी निदेशक | एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक |
जोडारी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक. |
प्रिप्रेटरी | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
मिलिंग पर्यवेक्षक | एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
शारीरिक कवायत निदेशक | एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र. |
शारीरिक शिक्षक निदेशक | एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य. |
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 आवश्यक वयोमर्यादा
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा खाली दिलेली आहे.
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 01/01/2024 राहील.
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्ष
- मागर्वर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष
- पदवीधर अंशकालीन प्रवर्गासाठी – 18 ते 55 वर्ष
- खेळाडू प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्ष
- प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्ष
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.