Table of Contents
वाक्य पृथक्करण
वाक्य पृथक्करण: अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 साठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य. अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 मध्ये पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात वाक्य पृथक्करणबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.
वाक्य पृथक्करण: विहंगावलोकन
वाक्य पृथक्करण: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त |
विषय | मराठी व्याकरण |
लेखाचे नाव | वाक्य पृथक्करण |
वाक्य पृथक्करण
पृथक् या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘वेगळे’. वाक्यातील घटक वेगळे करून त्यांचा एकमेकांसोबत असलेल्या संबंध दाखवणे म्हणजे वाक्य पृथक्करण होय.
वाक्याचे विभाजन दोन विभागांमध्ये केले जाते.
- उद्देश्य विभाग
- उद्देश्य (कर्ता)
- उद्देश्य विस्तार
- विधेय विभाग
- कर्म व कर्म विस्तार
- विधानपूरक
- विधेय विस्तार
- विधेय (क्रियापद)
- विधेयपुरक
- आधारपुरक
उद्देश्य विभाग
1.उद्देश्य (कर्ता): – वाक्याचा कर्ता म्हणजे वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो होय. चा/ची/चे/च्या व झा/झी/झे/झ्या हे प्रत्यय लागलेला शब्द जास्त करून वाक्यातील कर्ता किंवा कर्म नसतो. तर त्यापुढचा शब्द कर्ता किंवा कर्म असतो.
उदा.
- श्यामचे पुस्तक फाटले. (फाटणारे काय?)
- बाबूरावांचा बैल मेला. (मारणारे कोण?)
2.उद्देश्य विस्तार: – कर्त्यापूर्वी जर कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांना उद्देश्य विस्तार असे म्हणतात. या शब्दांना चा/ची/चे/च्या व झा/झी/झे/झ्या हे प्रत्यय असतात.
उदा.
- शेजारचा रामू पास झाला.
- नियमित व्यायाम करणारे विद्यार्थी सशक्त असतात.
विधेय विभाग
1.कर्म व कर्मविस्तार : कर्म म्हणजे प्रत्यक्ष क्रिया ज्याच्यावर घडते. कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्मविस्तार, या शब्दाला शक्यतो चा/ची/चे/च्या प्रत्यय असतो.
उदा.
- रामूने झाडाचा आंबा तोडला. (झाड तोडले की आंबा?) – कर्म
- रामूने झाडाचा आंबा तोडला. कर्म विस्तार
2.विधानपूरक : कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर ते विधानपूरक / विधीपूरक मानावे. याशिवाय कर्ता व क्रियापद सोडून इतर कोणताही शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जातो त्याला पूरक म्हणतात. कर्म सुद्धा एक पूरकाचाच प्रकार आहे.
उदा.
- राम राजा झाला.
- कमला डॉक्टर आहे.
3.विधेयविस्तार : जे शब्द क्रियापदा विषयी माहिती सांगतात त्यांना विधेयविस्तार असे म्हणतात. क्रियापदाला केव्हा / कोठे/कसेने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते.
उदा.
- परवा दुपारी, समोरच्या घरातील टाकीत रमेश धपकन पडला.
4.विधेय/क्रियापद : विधेय म्हणजेच क्रियापद होय.
उदा.
- तो सुंदर खेळतो.
- सुद्धा छान गाते.
5.विधेय पूरक : एकाच वाक्यात दोन कर्म असतील तर त्यातील दान घेणारे कर्म म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरक असते.
उदा.
- राजाने राणीला हार दिला.
6.आधारपूरक : आधारपूरक म्हणजे क्रिया ज्या ठिकाणावर/ स्थळावर होते ते स्थळ/ठिकाण.
उदा. रमेशने वहीवर नाव लिहीले.
वाक्य पृथक्करण: नमुना प्रश्न
प्रश्न 1. अक्षयचे बाबा गावाला गेले- वाक्यातील कर्ता ओळखा.
(a) अक्षय
(b) बाबा
(c) गाव
(d) यापैकी नाही
उत्तर- (b)
प्रश्न 2. काळे डोळे छान दिसतात. या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
(a) डोळे
(b) काळे
(c) छान
(d) दिसतात
उत्तर- (a)
प्रश्न 3. सचिन उत्तम क्रिकेट खेळतो. या वाक्यातील विधेय ओळखा.
(a) सचिन
(b) उत्तम
(c) क्रिकेट
(d) खेळतो
उत्तर- (d)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.