Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

Table of Contents

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: आज दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग विभाग पदसंख्या
1. पुरवठा निरीक्षक कोकण 47
पुणे 82
नाशिक 49
छत्रपती संभाजीनगर 88
अमरावती 35
नागपूर 23
2. उच्चस्तर लिपिक वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई 21
एकूण 345

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना 12 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 13 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज प्रक्रिया

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचे टप्पे :-

  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://mahafood.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
  • आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
  • परीक्षा केंद्र निवड करणे.
  • उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा 1800 103 4566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

विहित कागदपत्र/प्रमाणपत्र सादर करणेबाबत :-

  • प्रोफाईलमध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरीता अर्ज सादर करताना उमेदवारांना हस्तलिखित स्वयंघोषणापत्र व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची सदर परीक्षेच्या निकालानंतर अंतिम निवड झाल्यास उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार सोबतच्या परिशिष्ट-नऊ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
  • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.

सर्वसधारण सूचना :-

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/

परीक्षा केंद्र :-

  • अर्ज सादर करतानाच परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल. परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास उमदेवाराने मागणी केलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त अन्य केंद्र देण्याचा अधिकार असेल, तसे ते दिले जाऊ शकते. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

विषय प्रश्न  गुण दर्जा  माध्यम वेळ
मराठी 25 50 बारावी मराठी 2 तास
इंग्रजी 25 50 इंग्रजी
बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 50 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 50

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अभ्यासक्रम

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ.क्र. घटक व उपघटक 
1. मराठी

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न
2. इंग्रजी

  • General Vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension of passage
3. सामान्य ज्ञान

  • चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

  •  नागरीकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  •  इतिहास- आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोगधंदे, इत्यादी.
  • अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. 1 तसेचह शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)

4. बौद्धिक चाचणी व अंकगणित

  • बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

  •  अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक S-10 :29200-92300
उच्चस्तर लिपिक S-8 :25500-81100

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होणार आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.