Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024, शिफ्ट 2, 26 फेब्रुवारी 2024

Table of Contents

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024   

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 2023-24 भरती अंतर्गत दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये पुरवठा निरीक्षक पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 2 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या दुसऱ्या शिफ्टचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023-24
पदाचे नाव पुरवठा निरीक्षक
लेखाचे नाव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 शिफ्ट 2, 26 फेब्रुवारी 2024
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षेचे स्वरूप 2024

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 50
एकूण 100 200  

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024 ही 26 फेब्रुवारी 2024 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 08.30 ते 10.30
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30 ते 06.30

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते  मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 21-23 सोपी
2 इंग्रजी भाषा 22-24 मध्यम
3 सामान्य ज्ञान  20-22 मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 मध्यम
एकूण 85-92 मध्यम

विषयानुरूप अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 (शिफ्ट 2)

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • समानार्थी शब्द – 2 प्रश्न
  • लिंग ओळख – 2 प्रश्न
  • अनेकवचन -3 प्रश्न
  • उतारा -5/6 प्रश्न
  • होकारार्थी वाक्य -2 प्रश्न
  • व्याकरण दृष्ट्या चुकीचा भाग -3 प्रश्न
  • काळ – 3 प्रश्न

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms and Phrases- their meaning and use, Comprehension इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Correct spelt word -4/5 Que
  • Error -3/4 Que
  • Opposite word – 1 Que
  • Idiom & phrase – 2 Que
  • Paragraph -6 Que
  • Fill in the blank -5 Que
  • Sentence arrangement -5 Que

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
  • विज्ञान – 2 प्रश्न
  • इतिहास – 3 प्रश्न
  • राज्यघटना – 3 प्रश्न
  • भूगोल – 2 प्रश्न
  • चालू घडामोडी- 12 ते 13 प्रश्न

परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत

  • रिझर्व बँक – नाने विषयक मार्ग दर्शक तत्वे
  • यशवंतराव चव्हाण – चार वाक्य
  • धरण
  • CPI RATE
  • श्रावण बाळ योजना – अनुदान
  • PM सूर्योदय योजना
  • IONS – 2024 मीटिंग कुठे झाली?
  • खेलो इंडिया 2024 – कोणते राज्य शीर्ष स्थानी होते?
  • प्रस्तावना – शब्द – गणराज्य, धर्म निरपेक्ष ई.
  • अंतरिम बजेट ला दुसर नाव
  • जानेवारी 2024 -दागिने रत्ने निर्यात करणाऱ्या मोठ्या उद्योजकांची मीटिंग कूठे झाली.
  • 1665 पेशींचा शोध – रॉबर्ट हूक
  • पेट्रोलियम मधील घटक (component) बिटूमिन, केरोसीन, डिझेल, असे पाच पर्याय होते.
  • नेशन इन मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  • मनिभवण संग्रहालय कूठे आहे.
  • भारतीय प्रवासी दिवस – 9 जानेवरी
  • दख्खन पठाराच्या उत्तरेकडील पर्वत रांग कोणती आहे.
  • विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधीत व्यक्ती – 5 पर्याय

बौद्धिक चाचणी व अंकगणित विषयाचे विश्लेषण

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 अंतर्गत पुरवठा निरीक्षक मधील पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयात सामान्य बुध्दीमापन व आकलन, तर्क आधारीत प्रश्न आणि अंकगणित आधारीत प्रश्न इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • वयवारी
  • गुणोत्तर प्रमाण – दूध आणि पाणी
  • सरळव्याज
  • आयात, चौरस – क्षेत्रफळ, परिमिती
  • अक्षर मालिका –
  • अंकमालिका
  • सरलीकरण -3 प्रश्न
  • चायनीज कोडींग – 4-5 प्रश्न

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2024 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा कधी होणार आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण परीक्षा विश्लेषण 2024 कोठे तपासू शकतो?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा विश्लेषण 2024 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणविभाग परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.