Marathi govt jobs   »   MAFSU भरती 2024

MAFSU भरती 2024, 64 पदांसाठी अर्ज करा

MAFSU भरती 2024

MAFSU भरती 2024: महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाणे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी  सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण 64 रिक्त पदे भरण्यासाठी MAFSU भरती 2024 जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण MAFSU भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MAFSU भरती 2024: विहंगावलोकन 

MAFSU भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MAFSU भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ
भरतीचे नाव MAFSU भरती 2024
पदांची नावे सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदे 64
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mafsu.in/

MAFSU भरती 2024: अधिसुचना 

MAFSU भरती 2024 अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

MAFSU भरती 2024 अधिसुचना PDF

MAFSU भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

MAFSU भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. सहाय्यक प्राध्यापक अनुसूचित जाती 06
अनुसूचित जमाती 07
विमुक्त जाती (अ) 03
भटक्या जाती (ब) 03
भटक्या जाती (क) 02
भटक्या जाती (ड) 01
विशेष मागास प्रवर्ग 02
इतर मागास प्रवर्ग 11
ईडब्ल्यूएस 06
अराखीव 23
एकूण 64

MAFSU भरती 2024: पात्रता निकष

MAFSU भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

पशुवैद्यकीय विज्ञान, दुग्धशाळा तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्याशाखांतर्गत प्राध्यापक आणि समकक्ष (तक्ता क्रमांक 3 मध्ये दर्शविलेले) खालीलप्रमाणे आहे.
a) अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
b) अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.
c) पशुवैद्यकीय विज्ञान विद्याशाखेच्या पदांच्या बाबतीत, VCI/राज्य पशुवैद्यकीय परिषदेची नोंदणी अनिवार्य आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला नोंदणी वैध असेल.
d) अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला असिस्टंट प्रोफेसर आणि समकक्ष पदासाठी उच्च वयोमर्यादा 38 वर्षे (आरक्षित श्रेणीसाठी 43 वर्षे) असेल.

MAFSU भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक अर्हता

  • कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठातून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी किमान 700 CGPA/OGPA किंवा 70% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयात कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठाव्यतिरिक्त पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी किमान 55% गुण किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी.

MAFSU भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

MAFSU भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

MAFSU भरती 2024: महत्वाच्या तारखा
MAFSU भरती 2024 अधिसूचना 15 फेब्रुवारी 2024
MAFSU भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 15 फेब्रुवारी 2024
MAFSU भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 मार्च 2024

MAFSU भरती 2024 ऑफलाईन अर्ज पत्ता

MAFSU भरती 2024 साठी ऑफलाईन अर्ज खालील पत्त्यावर अर्ज करा.

“रजिस्ट्रार, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर- 440001”

MAFSU भरती 2024: अर्ज शुल्क

MAFSU भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

MAFSU भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1500
इतर सर्व प्रवर्ग रु. 750

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MAFSU भरती 2024 कधी जाहीर झाली?

MAFSU भरती 2024 15 फेब्रुवारी 2024 जाहीर झाली

MAFSU भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

MAFSU भरती 2024 64 पदांसाठी जाहीर झाली.

MAFSU भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

MAFSU भरती 2024 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी जाहीर झाली.