Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी

महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी, जिल्हा न्यायालय भरती: Last Minute Revision

महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?

महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?: सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वस्तूंना इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात. किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आहे. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. आज आपण या लेखात महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार किल्ले, महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले:  महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे खूप सुंदर वर्णन केले आहे.

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं.

महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?

महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?: महाराष्ट्रात सुमारे 350 किल्ले आहेत. महाराष्ट्र हा किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला किल्ल्याची सविस्तर माहिती मिळेल. राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरूळगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते.

किल्ला म्हणजे काय?

किल्ला म्हणजे काय?: जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले (Forts in Maharashtra) ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत.

Forts in Maharashtra
तोरणा किल्ला

Sharing is caring!

FAQs

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला?

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

किल्ला म्हणजे काय?

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किला हा रायगड आहे.