Marathi govt jobs   »   KVIC project ‘BOLD’ to boost tribal...

KVIC project ‘BOLD’ to boost tribal income I आदिवासींच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी केव्हीआयसी ने ‘बोल्ड’ प्रकल्प सुरु केला

KVIC project 'BOLD' to boost tribal income I आदिवासींच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी केव्हीआयसी ने 'बोल्ड' प्रकल्प सुरु केला_2.1

 

आदिवासींच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी केव्हीआयसी ने ‘बोल्ड’ प्रकल्प सुरु केला

केव्हीआयसी (खादी व ग्रामोद्योग आयोग) ने “बीओएलडी: बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्रॉट” नावाचा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे शुष्क आणि अर्ध-शुष्क जमिनीवर बांबूची लागवड करून वनीकरण केले जाणार आहे. भारतात प्रथमच होणाऱ्या या प्रयोगाची सुरुवात राजस्थानातील उदयपुर जिल्ह्यातील निचला मांडवा या आदिवासी खेड्यातून होणार आहे. या प्रकल्पांतर्गत बांबूसा तुळदा आणि बांबूसा पॉलिमॉर्फा या बांबू प्रजातींच्या 5000 रोपट्यांची लागवड ग्राम पंचायतीच्या सुमारे 16 एकर जागेवर करण्यात आली आहे.

बांबू ही बारमाही सदाहरित वनस्पती असून तिची वर्गवारी वनस्पतींमध्ये न होता गवत या प्रकारात केली जाते. देशातील एकूण उत्पादनापैकी 70% उत्पादन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये केले जाते.

बांबूचीच निवड का करण्यात आली? 

  • बांबूची वाढ वेगाने होते आणि 3 वर्षांत त्याची कापणी करता येते.
  • ते जलसंवर्धन वाढविण्यासाठी आणि बाष्पीभवन करण्यासाठी प्रसिद्ध असून शुष्क प्रदेशांकरिता वरदान ठरू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • केव्हीआयसीची स्थापना: 1956
  • केव्हीआयसी मुख्यालय: मुंबई
  • केव्हीआयसी अध्यक्ष: विनय कुमार सक्सेना 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!