Marathi govt jobs   »   International Asteroid Day: 30 June I...

International Asteroid Day: 30 June I 30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

International Asteroid Day: 30 June I 30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन_2.1

 

30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

दरवर्षी 30 जून रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लघुग्रहांच्या संभाव्य आघाताबद्द्ल जनजागृती करणे आणि या आघातादरम्यान करावयाच्या संकटाच्या संप्रेषण कृतीबद्दल जनतेला माहिती देणे हा आहे. 30 जून 1908 रोजी रशियन फेडरेशनच्या सायबेरिया येथील तुंगुस्का झालेल्या लघुग्रह आघाताच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने डिसेंबर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने एका ठरावाद्वारे 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून पाळण्याचे ठरविले.

लघुग्रह एक लहान खडकाळ वस्तू असून मंगळ व गुरूच्या कक्षेदरम्यान आढळतात. त्यांचा आकार छोट्या दगडापासून ते 600 मैल लांब महाकाय खडकाएवढा असू शकतो. सूर्याला परिभ्रमण करीत असले तरी त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना ग्रह मानण्यात येत नाही, ते सूर्यमालेतील उरलेले पदार्थ म्हणून ओळखले जातात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन आउटर स्पेस अफेयर्स (यूएनओओएसए) चे संचालक: सायमोनेटा डी पिप्पो 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!