Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   India launches UNITE Aware Platform

India launches UNITE Aware Platform | भारताने युएनआयटीई अवेअर व्यासपीठ सुरु केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारताने युएनआयटीई अवेअर व्यासपीठ सुरु केले

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुधारण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रचालन विभाग आणि कार्यकारी सहाय्य विभागाच्या सहकार्याने “युएनआयटीई अवेअर” नावाचे एक टेक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. संयुक्त राष्ट्र मुख्यालयात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले. भारत ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताने यासाठी 1.64 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले आहे. हे व्यासपीठ संयुक्त राष्ट्र शांतीसेनेच्या कर्मचाऱ्यांना (ब्लू हेल्मेट) कारवाईच्या क्षेत्रात भूभागाशी संबंधित माहिती प्रदान करेल.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 19 August 2021

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पीसकीपिंग ऑपरेशन्ससाठी सरचिटणीस: जीन-पियरे लॅक्रॉइक्स
  • शांतता प्रचालन विभाग स्थापना: मार्च 1992
  • पीसकीपिंग ऑपरेशन्स विभाग मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!