Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | इतिहास |
टॉपिक | आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions |
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions
- भारत सेवक समाज – गोपाळ कृष्ण गोखले
- आदी ब्राह्मो समाज – देवेंद्रनाथ टागोर
- सार्वजनिक सभा – गणेश वासुदेव जोशी
- प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग तर्खडकर
- आर्य समाज( कोल्हापूर )- शाहू महाराज
- भारतीय ब्राह्मो समाज – केशवचंद्र सेन
- तरुण ब्राह्मो समाज -वि.रा.शिंदे
- नवविधान समाज – केशवचंद्र सेन
- वृद्धांसाठी संगत सभा – वि.रा.शिंदे
- भारत कृषक समाज – पंजाबराव देशमुख
- डेक्कन एजुकेशन सोसायटी – टिळक, आगरकर व चिपळूणकर
- रयत शिक्षण संस्था – कर्मवीर भाऊराव पाटील
- ब्राह्मो समाज – राजाराम मोहनरॉय
- श्री शिवाजी शिक्षण संस्था – पंजाबराव देशमुख
- मानवधर्म सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर
- परमहंस सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर व ईश्वरचंद्र विद्यासागर
- ज्ञानप्रसारक सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर
- मद्रास महाजन सभा – सुब्रमण्यम अय्यर व पी.आनंदा चार्लू
- डेक्कन रयत शिक्षण संस्था- शाहू महाराज
- आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती
- पीपल्स एज्युकेशन सोसायटी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- हिंदू महासभा – मदनमोहन मालवीय
- वक्तृत्व उत्तेजक सभा – न्या.महादेव गोविंद रानडे
- आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ – वि.रा.शिंदे
- ग्रँट मेडिकल कॉलेज – जगन्नाथ शंकरशेठ
- डेक्कन सभा – न्या.महादेव गोविंद रानडे
- एशियाटीक सोसायटी – विल्यम जोन्स
- आर्य महिला समाज – पंडिता रमाबाई
- ग्रँट मेडिकल सोसायटी – भाऊ दाजी लाड
- सत्यशोधक समाज – महात्मा फुले
- सत्यशोधक समाज (कोल्हापूर) – शाहू महाराज
- सार्वजनिक समाज – आनंदमोहन बोस
- बंगाल एशियाटिक सोसायटी- विल्यम जोन्स
- बॉम्बे नेटीव्ह स्कूल बुक सोसायटी- जगन्नाथ शंकरशेठ
- मराठा एज्यूकेशन सोसायटी – शाहू महाराज
- सेवा समिती – हृदयनाथ कुंझरु
- इंडियन होमरूल सोसायटी – श्यामजी कृष्ण वर्मा
- किंग एड्वर्ड मोहमदन एज्यूकेशन सोसायटी – शाहू महाराज
- लंडन इंडियन सोसायटी – दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी
- निष्काम कर्ममठ – महर्षी धों.के.कर्वे
- निष्काम कर्मयोगी – वि.रा.शिंदे
- अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी)- वि.रा.शिंदे
- सायन्टिफिक सोसायटी- सर सय्यद अहमद खान
- थिलॉसोफिकॅल सोसायटी – मॅडम ब्लावस्की व कर्नल अल्कॅाट
- अनाथ बालिकाश्रम – महर्षी धों.के.कर्वे
- व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग – शाहू महाराज
- सेवासदन – वि.रा.शिंदे
- पवनार आश्रम (वर्धा) – विनोबा भावे
- शारदासदन (मुंबई) – पंडिता रमाबाई
- पूना सेवा सदन – रमाबाई रानडे
- पुनार्विवाह उत्तेजक मंडळी – न्या.म.गो.रानडे
- विक्टोरिया अनाथाश्रम – महात्मा फुले
- कृपासदन व प्रितीसदन -पंडिता रमाबाई
- महारष्ट्र धर्म – विनोबा भावे
- मुक्तीसदन केडगाव – पंडिता रमाबाई
- पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह – साने गुरुजी
- काळाराम मंदिर सत्याग्रह – बाबासाहेब आंबेडकर
- पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह – एस.एम.जोशी
- विधवा विवाहउत्तेजक मंडळी – महर्षी धो.के.कर्वे
- देशी व्यापार उत्तेजक मंडळी- ग.वा.जोशी
- मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी- न्या.म.गो.रानडे
- मोहमेदम लिटररी सोसायटी- अब्दुल लतिफ
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.