Marathi govt jobs   »   Historical Background of Maharashtra | महाराष्ट्र...

Historical Background of Maharashtra | महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी

Historical Background of Maharashtra | महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी_2.1

महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी

मुंबई इलाखा (1618-1937) :-

मुंबई इलाखा एकूण जिल्हे : 25

प्रादेशिक विभाग : 4 (अहमदाबाद, पुणे, बेळगांव, कराची)

बॉम्बे प्रांत (1937-47) :-

1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये स्थापना यामध्ये संस्थानांचे 2 गट व ब्रिटिश जिल्हे असे या प्रांताचे विभाजन.

मुंबई राज्य (1947-56) :-

भारत स्वातंत्र्याच्या वेळी मुंबई प्रांताचे तीन राज्यामध्ये विभाजन. 1. सौराष्ट्र, 2. मुंबई 3. कच्छ

द्विभाषिक मुंबई राज्य (1956-60) :-

कच्छ व सौराष्ट्र या प्रांताचे विलिनिकरण मुंबई राज्यात करून 1956 साली फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार या राज्याची स्थापना.

महाराष्ट्र राज्य (1 मे 1960) :-

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.

(१ मे : महाराष्ट्र दिन)

Historical Background of Maharashtra | महाराष्ट्र राज्याची पार्श्वभूमी_3.1

महाराष्ट्र राज्यात या कालावधीत 26 जिल्ह्यांचा समावेश होता

  1. पुर्वीच्या मुंबई राज्याचे 13 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले.
  2. हैद्राबाद राज्यातील 5 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले. (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मनाबाद)
  3. मध्यप्रांतातील विदर्भाचे 8 जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले. (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, बुलढाणा, अकोला)

त्याच प्रमाणे खालील चार विभागाचा समावेश होता

1.मुंबई विभाग (7) : बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव

2.पुणे विभाग (6) : पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

3.नागपूर विभाग (8) : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला.

4.औरंगाबाद विभाग (5) : औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद

१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात चार विभाग, २६ जिल्हे, २५३ तालुके, २८९ शहरे व ३५५७ खेडी अस्तीत्वात होती.

महाराष्ट्र विविध परीक्षा साहित्य

१९८१ साली पुणे व मुंबई विभाग यांची पुर्नरचना होऊन नाशिक हा नवीन प्रशासकीय व महसूल विभाग तयार झाला. तसेच नागपूर विभागाची पुर्नरचना होऊन अमरावती हा प्रशासकीय विभाग तयार झाला.

सद्यस्थितीत ६ प्रशासकीय विभागाअंतर्गत महाराष्ट्रात ३६ जिल्हे अस्तित्वात आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळची स्थिती

महाराष्ट्राची सध्याची स्थिती

प्रशासकीय विभाग : 04 (कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर)

जिल्हे : 26

तालुके : 235

लोकसंख्या : 04 कोटी

 

 

प्रशासकीय विभाग : 06 (औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण – क्षेत्रफळानुसार उतरता क्रम)

जिल्हे : 36 (पालघर-36 वा 2014)

तालुके : 358 (सर्वाधिक औरंगाबाद विभागात – 76)

लोकसंख्या : 11.23 कोटी

 

 

 

 

 

Sharing is caring!