Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023, गट क मधील काही पदांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर  

आरोग्य विभाग गट क सुधारित अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023: आरोग्य विभागाने दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी सुधारित अभ्यासक्रम जारी केला आहे. आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या गट क पदांच्या भरती साठी आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तरपणे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. आरोग्य विभाग परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. या लेखात आपण आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन 

आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023
पदे गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 10949
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023
30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट क पदांच्या भरती साठी अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. आरोग्य विभाग भरती 2023 मधील गट क संवर्गाची परीक्षा एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. गट क पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नप्रत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.

गट क मधील पदांची यादी:

  • House & Linen Keeper / Store cum Linen keeper (गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल)
  • Laboratory Scientific Officer (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी)
  • Laboratory Assistant (प्रयोगशाळा सहाय्यक)
  • X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer (क्ष-किरण तंत्रज्ञ / क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी)
  • Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer (रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी)
  • Pharmacy Officer (फार्मसी अधिकारी)
  • ECG Technician (ईसीजी तंत्रज्ञ)
  • Dental Mechanic (डेंटल मेकॅनिक)
  • Dialysis Technician (डायलिसिस टेक्निशियन)
  • Staff Nurse (स्टाफ नर्स)
  • Staff Nurse Private (स्टाफ नर्स प्रायव्हेट)
  • Telephone Operator (टेलिफोन ऑपरेटर)
  • Driver (ड्रायव्हर)
  • Tailor (टेलर)
  • Plumber (प्लंबर)
  • Carpenter (सुतार)
  • Ophthalmic Officer (नेत्ररोग अधिकारी)
  • Psychiatric Social Worker/Social Superintendent (सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक)
  • Physiotherapist (फिजिओथेरपिस्ट)
  • Occupational Therapist (ऑक्युपेशनल थेरपिस्ट)
  • Non-Medical Assistant (गैर-वैद्यकीय सहाय्यक)
  • Warden (वॉर्डन)
  • Record Keeper (रेकॉर्ड कीपर)
  • Supervisor (पर्यवेक्षक )
  • Electrician (Transport) (इलेक्ट्रीशियन (वाहतूक))
  • Skilled Artizen (कुशल कलाकार)
  • Senior Technical Assistant (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
  • Junior Technical Assistant (कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
  • Technician HEMR (HEMR तंत्रज्ञ)
  • Statistical Investigator (सांख्यिकी तपासणीस)
  • Foreman (फोरमन)
  • Service Engineer (सेवा अभियंता)
  • Senior Security Assistant (वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक)
  • Medical SocialWorker/Scial Superintendent (Medical) (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय))
  • Higher Grade Stenographer (उच्च श्रेणी लघुलेखक)
  • Lower Grade Stenographer (निम्न श्रेणी लघुलेखक)
  • Steno Typist (लघुलेखक)
  • Health Inspector (आरोग्य निरीक्षक)
  • Librarian (ग्रंथपाल)
  • Electrician (इलेक्ट्रीशियन)
  • Operation Theatre Assistant (ऑपरेशन थिएटर सहाय्यक )
  • Mouldroom Technician/Radiography Technician (मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ)
  • Multi-Purpose Health Worker (Male) (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
  • Junior Oversear (कनिष्ठ पर्यवेक्षक)

अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय प्रत्येक पदासाठी आवश्यक आहेत. त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

आरोग्य विभाग अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम 2023
अ.क्र. विषयाचे नाव – इंग्रजी 
1 a Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.)
b Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
c Fill in the blanks in sentence
d Simple Sentence structure
2 विषयाचे नाव – मराठी
a मराठी व्याकरण (वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द)
b भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी )
c प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
d योग्य जोड्या लावा
3 विषयाचे नाव – सामान्य ज्ञान 
a चालू घडामोडी (भारत आणि महाराष्ट्र)
b भारतीय इतिहास – नागरिकशास्त्र
c भारताचा भूगोल
d भारतीय संविधान
e सामान्य विज्ञान
f खेळ आणि संस्कृती
g माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015
h माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित मूलभूत ज्ञान
4 विषयाचे नाव – बौद्धिक चाचणी 
a अभियोग्यता चाचणी
b मूलभूत अंकगणित ज्ञान
c गणित (अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी)
d सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान)

सुधारित निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

अ.क्र. विषयाचे नाव – इंग्रजी 
1 a Spelling, Grammar, Simple Sentence structure, Use of common words
2 विषयाचे नाव – मराठी
a व्याकरण, सोपी वाक्य रचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्य प्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
3 विषयाचे नाव – सामान्य ज्ञान 
a दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञान
4 विषयाचे नाव – बौद्धिक चाचणी 
a अभियोग्यता चाचणी
b मूलभूत अंकगणित ज्ञान
c गणित (अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी)
d सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान)

तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

आरोग्य विभाग भरतीअंतर्गत प्रत्येक पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम हा वेगळा आहे. उमेदवार पदानुसार तांत्रिक अभ्यासक्रम खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2023 डाउनलोड लिंक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आरोग्य विभाग गट क सुधारित अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, आरोग्य विभाग गट क सुधारित अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.